Pashmi Dog: पश्मी श्वानाची किंमत आणि उपयोग काय?

Pashmi Dog Breed: राजेरजवाड्यांच्या काळात युद्धात तसेच शिकारीसाठी उपयोगी ठरणाऱ्या पश्‍मी या अवर्णीत श्‍वानांना स्वतंत्र ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) व पशुसंवर्धन विभाग यांच्या सहकार्याने होत आहेत. या श्‍वानांच्या संदर्भाने माहिती संकलनाचे काम होती घेण्यात आले आहे. मग या श्वानाची किंमत आणि उपयोग काय तेच जाणून घेऊया.

पश्‍मी श्‍वानासंदर्भाने डॉ. पंडीत नांदेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाणवळ (ता. चाकूर, लातूर) व आजूबाजूच्या भाग हा पश्‍मी श्‍वानांचे हे मूळ आहे. लातूर, परभणी, नांदेड, सातारा, सांगली, सोलापूर, पुण्यासह महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात ते आढळते. कर्नाटक, तेलंगणा, उत्तराखंड, तमिळनाडू, दिल्ली, छत्तीसगड, पश्‍चिम बंगाल व आंध्र प्रदेश राज्यांतही त्यांना संरक्षण व शिकारीकामी नेण्यात आले. श्वानास जाणवळ पश्‍मी, भारतीय हॉउंड असेही संबोधले जाते. राजा-महराजांसह शेतकऱ्यांकडून यांचा शिकारसाठी उपयोग होत होता. हिंस्त्र वन्यप्राण्यांनी हल्ला केल्यास बचावाकरिता या श्‍वानांच्या कॉलर बेल्टला खिळे लावले जात होते. पश्‍मी श्‍वानांच्या कानावर, पंजावर, मांडीवर जास्त प्रमाणात केस आढळतात. वातावरणानुसार केस वाढ पाहवयास मिळते. प्रामुख्याने रंग काळा, राखडी, सोनेरी, कत्था, पांढरा असतो. यांची मान बारीक, लवचिक, ओठ घट्ट चिकटलेले, कान लांब व खालील बाजूस झुकलेले, शेपटीच्या टोकाशी अंगठीप्रमाणे अर्थ वेटोळा पाहवयास मिळतो. ते २४ ते ३० इंचांपर्यंत वाढून १७ ते ३८ किलो वजनाचे असतात. चपळ, सहनशक्‍ती खूप, शांत, धाडसी, अलर्ट अशी अनेक वैशिष्ट्ये या श्‍नानांची आहेत. विशेषतः या श्‍वानांचा उपयोग संरक्षणकामी होतो, असे डॉ. पंडीत नांदेडकर यांनी सांगितले.  २००८ या वर्षातील लातूर गॅझेटमध्ये पश्‍मी श्‍वानाचा १९२५ पासून शिकारीसाठी उपयोग होत असल्याच्या नोंदी आहेत. पश्‍मी श्वान नोंदणी प्रस्ताव राष्ट्रीय पशू अनुवांशिक संशोधन ब्युरो (कर्नाल, हरियाना) येथे डिसेंबरमध्ये दाखल केला गेला आहे. येथील शास्त्रज्ञांच्या चमूने सप्टेंबरमध्ये लातूर व आजूबाजूच्या भागांत हे श्वान जैवविविधता सांभाळून असल्याचे मत नोंदविले होते. आजघडीला देशात या श्‍वानांची संख्या पाच हजारांवर पोहोचली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com