Cotton Seeds: कापसाच्या नव्या बीटी तणनाशक सहनशील वाणाला केंद्र सरकारकडून परवानगी मिळण्याचे संकेत

Cotton Crop: देशातील कापूस उत्पादन वाढीसाठी बीटी बोलगार्ड ३ ला परवानगी मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

BT Cotton New Seeds: देशात सध्या बीटी बोलगार्ड २ चा वापर केला जातो. बीटी २ तंत्रज्ञानात बोलगार्डचे म्हणजे बिजीचे दोन जीन वापरले जातात. केंद्र सरकारने परवानगी दिली तर तीन जीन वापरले जाणार आहेत. तुम्हाला माहित्ये की, बीटी बोलगार्ड २ बोंडअळी प्रतिबंधात्मक वाण आहे. पण अलीकडे गुलाबी बोंडअळीनं डोकं वर काढलंय. बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला की, उत्पादनाला फटका बसतो. किटकनाशकांच्या खर्चात वाढ होते. त्यामुळे केंद्रीय मंत्री सिंह म्हणाले, "देशात एचबीटी बोलगार्ड ३ कापसाची चाचणी सुरू आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून (आयसीएआर) त्याचे मूल्यांकन सुरू आहे. आयसीएआरकडून मान्यता मिळाल्यानंतर लागवडीस परवानगी दिली जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि कापड उद्योगाला त्याचा फायदा होईल." असं सिंह म्हणाले. पुढं ते म्हणाले, "भारतातील कापडाच्या बाजारपेठेच्या वाढीसाठी कापूस उत्पादनाची चांगली गुणवत्ता महत्त्वाची आहे. कापड बाजारपेठेचा आकार सुमारे १६८ अब्ज डॉलर आहे. त्यामध्ये १० टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे २०२३० पर्यंत ३५० अब्ज डॉलर बिलियनपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com