POKARA Scheme: नवीन कृषी योजना लवकरच सुरु होणार

राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात आणि उत्पन्नात वाढ करण्यासाठी भांडवली गुंतवणुकीचा पर्याय समोर आला आहे. यासाठी पीकविम्यापोटी सरकारवर पडणारा बोजा कमी करून त्यातील उर्वरित रक्कम भांडवली गुंतवणुकीच्या रूपात शेतकऱ्यांसाठी वापरण्याचा पर्याय राज्य सरकार अवलंबणार आहे. भांडवली गुंतणवणुकीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या (पोकरा) धर्तीवर नवी योजना आणली जाणार आहे. यासाठी पीकविम्याची मिळणारी भरपाई पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष ठेवला जाणार असून, अन्य निकष रद्द करण्याचे नियोजन सुरू आहे.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेती क्षेत्रात पाच हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतणूक करण्याची घोषणा केली आहे. मात्र त्यासाठी निधी हा पीकविमा योजनेतील ट्रिगरना (निकष) कात्री लावून उभारला जाणार आहे. सध्या पीकविम्यासाठी विविध पाच निकष लावले जातात. यामध्ये प्रतिकूल हवामान घटकांमुळे पेरणी, लावण उगवण न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्‍चात नुकसान या निकषांनुसार पीकविमा दिला जात होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com