Neem: किड नियंत्रणासाठी निंबोळी अर्क प्रभावी

अनेक किडींच्या नियंत्रणासाठी किडनाशक म्हणून निंबोळी अर्काचा वापर होतो. अनेक किडींवर निंबोळी अर्क प्रभावी आहे. हा निबोळी अर्क कसा तयार करायचा याचीच माहिती आपण या व्हिडीओतून घेऊया.

निंबोळ्यापासून निंबोळी अर्क घरच्याघरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनविता येतो. निंबोळी अर्क तयार करण्यासाठी आधी निंबोळ्या गोळा करुन ठेवणं गरजेचं असतं. आपल्या शेताच्या बांधावर कडूनिंबाची भरपूर झाडे असतातचं. या कडुनिंबाच्या पिकलेल्या निंबोळ्या मे महिन्याच्या शेवटी तसेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडण्याच्या अगोदर गोळा करुन चांगल्या वाळवून स्वच्छ करुन ठेवाव्यात. ज्यावेळी पिकावर फवारणी करायची आहे त्याच्या आगोदरच्या दिवशी लागणाऱ्या आवश्यक तेवढ्या निंबोळ्या घेऊन कुटून बारीक कराव्यात. ५ किलो निंबोळीचा चुरा ९ लिटर पाण्यात फवारणीच्या आगोदरच्या दिवशी भिजत टाकाव्यात.याशिवाय १ लिटर पाण्यात १०० ग्रॅम साबणाचा चुरा वेगळा भिजत घालावा. दुसऱ्या दिवशी निंबोळीचा अर्क कापडातून चांगला गाळून घ्यावा. या अर्कात १ लिटर पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावे. हा सर्व अर्क एकूण १० लिटर होईल एवढे पाणी टाकावे. तयार केलेला १ लिटर अर्क १ लिटर पाण्यात मिसळून ढवळावा आणि फवारणीसाठी वापरावा. लक्षात ठेवा निंबोळी अर्क फवारणीच्या दिवशीच तयार करुन वापरावा लागतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com