Rain Update : पुढील ३ दिवसांमध्ये माॅन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता

Weather Update : मॉन्सूनचे आगमन तोंडावर आले असतानाच देशाच्या वायव्य आणि मध्य भागात तीव्र उन्हाळा अनुभवायला मिळत आहे. विदर्भातही सूर्याचा प्रकोप कायम असल्याने ब्रह्मपुरी येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४७.१ अंश तापमानाची नोंद झाली आहे. उद्या विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

Monsoon: आज मॉन्सूनची अरबी समुद्रातून वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे. मॉन्सूनने दक्षिण अरबी समुद्र आणि मालदीवच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. मॉन्सून ३१ मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने यापुर्वीच वर्तविला आहे. पुढील तीन ते चार दिवसांत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याचे संकेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com