Cotton Pest: वाणी किडीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना

Soybean Crop: सा किंवा वाणी ही एक निशाचर म्हणजे रात्रीच्या वेळी सक्रीय असणारी कीड असून, सडणारी पाने, काडीकचरा, कुजणाऱ्या वनस्पती खाऊन जगते.

Vani Pest: लगेच रासायनिक किडनाशकाची फवारणी न करता सुरुवातीला काही साधे उपाय करुन या किडीवर नियंत्रण मिळवता येतं. ते कसं तर, शेतातील पालापाचोळा किंवा वाळलेले कुजलेले घटक गोळा करून नष्ट करावेत. वाणी रात्री जास्त सक्रिय असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढीग करून ठेवावेत. सकाळी गवताच्या ढिगाखाली जमा झालेले वाणी जमा करून मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात टाकावेत. शेतातील आर्द्रता आणि लपण्याची ठिकाणे कमी करावीत. बांधावरील गवत, दगड काढून बांध मोकळा ठेवावा. बऱ्याचदा घनदाट पिकात जास्त किंवा संध्याकाळी पाणी दिल्यामुळे प्रादुर्भाव वाढतो. जास्त आर्द्रता व अन्नाचा पुरवठा नसल्यास काही दिवसांतच वाणी मरतात. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बियाण्याला बीजप्रक्रिया केली आहे, त्याठिकाणी प्रादुर्भाव कमी आढळून आलेला आहे. जमिनीतील अंडी व लपून बसलेल्या वाणी किडी उघड्या पडून नष्ट होण्यासाठी पिकामध्ये वेळेवर कोळपणी करावी. चांगला पाऊस पडल्यास या किडींचे नैसर्गिक नियंत्रण होतं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com