Grape Farm: द्राक्ष बागेत कलम करण्यासाठी परिपक्व काडी निवडणे आवश्यक

Grape Farming: कलम करण्यात वापरण्यात येणारी कलम काडी ही रोगमुक्त असावी. तसेच सतत जास्त व दर्जेदार उत्पादन देणाऱ्या वेलीवरून घ्यावी.

Grape Crop Care:  कलम करण्यात वापरण्यात येणारी कलम काडी ही रोगमुक्त असावी. तसेच सतत जास्त व दर्जेदार उत्पादन देणाऱ्या वेलीवरून घ्यावी. ज्या वेलीवरून कलम काडी काढायची आहे ती काडी पूर्णपणे परिपक्व असावी. अन्यथा, कलम सुरवातील यशस्वी झाल्यासारखे दिेसले तरी काही दिवसांमध्ये कलम जळून जाण्याची शक्यता असते. आता काडी परिपक्व झाली आहे ते कसे ओळखायचे तर काडी जर पूर्णपणे परिपक्व असेल तर पूर्ण खाकी रंगाची दिसते. अशा काडीचा काप घेतला तर आतील पीथ हे पूर्णपणे तपकिरी रंगाचे दिसेल. अशा प्रकारच्या काडीमध्ये आवश्यक ते अन्नद्रव्ये साठलेले असते. हेच अन्नद्रव्य कलम केल्यानंतर डोळे फुटून ३ ते ४ पाने अवस्था होईपर्यंत उपयोगी ठरते. त्यामुळे कलम करण्याकरिता बागेतून पूर्णपणे परिपक्व झालेली काडीच निव़डावी. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे ज्या बागेत पानगळ करण्यासाठी सजीवकांची फवारणी केलेली आहे, अशा बागेतून कलम काडी घेऊ नये.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com