Maize Market: मक्याचं मार्केट तेजीतच

Garlic Rate: सध्या लसणाला गुणवत्तेप्रमाणे १४ हजार ते २० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. लसणाचा पुरवठा आणखी काही महीने कमी राहू शकतो.

Cotton Rate: कापसाच्या वायद्यांमध्ये आणि बाजार समित्यांमधील भावावरील दबाव कायम आहे. आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे काहसे सुधारून ७१.८१ सेंटवर होते. देशातील वायदे मात्र ५८ हजार रुपयांवर होते. बाजार समित्यांमधील कापसाची आवक घटली आहे. तसेच अनेक बाजारात लिलावही बंद झाले आहेत. तर भावपातळी ७ हजार १०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहे. कापूस बाजारात सध्या अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com