Rain In July: जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर

IMD rain report July: जुलै महिन्यात देशात दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. जून महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. त्यामुळे अनेक भागांत पेरणीलाही चांगली गती मिळाली. आता जुलैमध्येही राज्यातील शेतकऱ्यांना पाऊस समाधानकारक ठरेल, अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

rain alert July: भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रे यांनी सोमवारी (३० जून) पत्रकार परिषदेत जुलै महिन्यातील पावसाचा अधिकृत अंदाज जाहीर केला. १९७१ ते २०२० या कालावधीतील सरासरी नुसार, जुलैमध्ये देशभरात सुमारे २८०.४ मिमी पावसाची नोंद होते. यंदा देशातील बहुतांश भागांमध्ये या सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. मात्र ईशान्य भारत, पूर्व भारत, दक्षिण द्वीपकल्प आणि वायव्य भारतातील काही भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com