Soybean market price: देशातील बाजारात मागील दोन आठवड्यांपासून सोयाबीनच्या दरात सुधारणा दिसून आली. प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ७०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांचा दर मिळत आहे. अलीकडच्या काही वर्षांपासून गावरान ज्वारीची मागणी वाढत आहे. सध्या राज्यात ज्वारी गुणवत्तेनुसार २ हजार ५०० ते ४ हजारांच्या दरम्यान विकली जात आहे.
देशात यंदा बेदाण्याचे उत्पादन कमी झाले. सध्या राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये बेदाणा २५० ते ३५० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. तर शेतकऱ्यांना मिळणारा दर २२० ते २७० रुपयांच्या दरम्यान आहे. ढोबळी मिरचीची बाजारातील आवकही कमी झाली आहे. ढोबळी मिरचीला सध्या बाजारात सरासरी गुणवत्तेप्रमाणे ३ हजार ५०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. राज्यातील बाजारात कोथिंबरची आवक काहीशी वाढलेल दिसत आहे. प्रतिक्विंटल सरासरी १५०० ते २ हजार रुपये दर मिळत आहे. तर प्रतिजुडी ४ रुपये ते ५ रुपयांचा भाव मिळत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.