Ajit Pawar: लाडकी बहिण योजनेसाठी उत्पन्नाची अट वगळली

Vidhan Sabha Session: आता मात्र ५ एकर जमिनीची अट राज्य सरकारनं काढून टाकली आहे. त्यामुळं आता ५ एकर जमीन नावावर असलेला महिलाही या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

Eknath Shinde: अडीच लाखाच्या वर उत्पन्न असलेल्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकत नव्हत्या. मात्र यामध्ये अट शिथिल करत पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक महिला सूट देण्यात आलीय. म्हणजे अर्जदार महिलेकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर अशा महिला योजनेसाठी अर्ज करू शकतील. तिसरा बदल आहे, अधिवास प्रमाणपत्राच्या सक्तीचा. त्यात बदल करून आता १५ वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला यापैकी कोणतं एक प्रमाणपत्र अर्जदाराकडे असावं, असा बदल करण्यात आलाय. चौथा बदल वयोमर्यादेचा आहे, किमान २१ ते कमाल ६० वर्षे वय अशी पात्रतेची अट होती. त्यात बदल करून आता किमान २१ ते कमाल ६५ वर्ष वय असलेल्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात, असा बदल करण्यात आलाय. महाराष्ट्राची रहिवाशी महिला, विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या, निराधार या योजनेसाठी पात्र होत्या. मात्र आता या योजनेसाठी अविवाहित महिलाही अर्ज करू शकतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com