Trichoderma Fungus: रोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा बुरशी कशी मदत करते? जाणून घ्या

कापूस, कडधान्य, तेलबिया, भाजीपाला व ऊस अशा विविध पिकांवर सुरवातीच्या काळात मर, मूळकुज, कॉलररॉट, खोडकुज आणि जमिनीत वाढणारे अनेक बुरशीजन्य रोग आढळून येतात. या रोगांसाठी फ्युजारियम, व्हर्टिसिलियम, रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा, पीथियम अशा बुरशी कारणीभूत असतात. त्यांच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकांचा वापर केला जात असला तरी पर्यावरणपूरक पर्याय म्हणून जैविक बुरशीनाशकांचा वापर फायदेशीर ठरतो.यामध्ये ट्रायकोडर्मा बुरशी उपयुक्त ठरते.

रोपवाटिकेतील रोपे अनेकदा अचानक मरतात. सुरुवातीच्या टप्प्यात कापूस, कडधान्य, भाजीपाला व ऊस पिकांना मर, मूळकुज, कॉलररॉट व खोडकुज यांसारखे बुरशीजन्य रोग होतात. हे रोग बियाणे व मातीमार्फत पसरतात. पारंपरिक बुरशीनाशकांऐवजी जैविक उपाय म्हणून ट्रायकोडर्मा बुरशी उपयुक्त ठरते. ही बुरशी रोगकारक बुरशीची वाढ रोखते, त्यामुळे बियाण्यावर बिजप्रक्रिया करण्याची शिफारस केली जाते. ट्रायकोडर्मा जमिनीत आढळणारी हिरव्या रंगाची उपयुक्त बुरशी आहे. ती बीजप्रक्रिया, माती प्रक्रिया, झाडांच्या बुंध्याभोवती आळवणी व फवारणीद्वारे वापरली जाते. ही बुरशी रोगकारक बुरशींना पोषकतत्त्वे मिळू देत नाही, त्यामुळे त्यांची वाढ खुंटते. ट्रायकोडर्मा बुरशी सेंद्रिय पदार्थ कुजवण्यास मदत करते. मात्र, तिचा रासायनिक बुरशीनाशकांसोबत वापर टाळावा आणि साठवणूक कोरड्या व थंड ठिकाणी करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com