Soybean Crop: सोयाबीन पिकावरील अळ्यांचा प्रादुर्भाव कसा रोखाल

Soybean Pest Management: सोयाबीन सुरुवातीच्या अवस्थेत पीक तणमुक्त ठेवावे. शेताच्या बांधावर असणा-या किडीच्या पुरक खाद्य वनस्पतीचा नाश करावा. किड लागलेली झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा.

Soyabean Cultivation: सोयाबीन सुरुवातीच्या अवस्थेत पीक तणमुक्त ठेवावे. शेताच्या बांधावर असणा-या किडीच्या पुरक खाद्य वनस्पतीचा नाश करावा. किड लागलेली झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा. तंबाखुवरील पाने खाणाऱ्या अळीची अंडी आणि सुरवातीच्या अवस्थेतील अळीग्रस्त पाने अलगद तोडून किडीसह नष्ट करावीत. हिरवी घाटेअळी आणि तंबाखुची पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव नेमका किती प्रमाणात झाला आहे हे ओळखण्यासाठी किडीच सर्वेक्षण करावं. सर्वेक्षणासाठी प्रत्येक किडीसाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे शेतात लावावेत. याशिवाय शेतात इंग्रजी ‘T’ अक्षरासारखे प्रति एकरी २० पक्षी थांबे लावावेत.तंबाखूवरील पाने खाणा-या अळीच्या व्यवस्थापनासाठी एसएलएनपीव्ही ५०० एलई विषाणू ४०० मिली किंवा नोमुरिया रिलाई या जैविक बुरशीची ८०० ग्रॅम प्रति एकरी फवारणी प्रादुर्भाव आढळून येताच करावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com