Farmer Scheme: नमोच्या निधीचं स्टेट्स कसं चेक करायचं ?

Namo Shetkari yojana installment: काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले तर काहींच्या खात्यात पैसे आले नाहीत. काही जमा होणार आहेत. नमोचा हप्ता कधी जमा होणार, चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रच येणार अशी चर्चा होती.

Namo Shetkari Yojana: तुमच्या मोबाइलच्या गुगलवर जाऊन सर्चमध्ये पीएमएफएस लिहा आणि सर्च करा. त्यानंतर स्क्रीनवर दिसणाऱ्या वेबसाइटवर क्लिक करा. आता वेबसाईट ओपन होईल. त्यामध्ये वरच्या पेमेंट स्टेट्समध्ये डीबीटी स्टेट्स ट्रकरवर क्लिक करा. आता एक नवीन पेज स्क्रीनवर ओपन झालेलं दिसेल. पण आता इथं तुम्हाला अंप्लीकेशन आयडी माहीत असला पाहिजे. माहीत नसेल तर एक मिनिटात तो कसा मिळवायचा ते सांगतो. आता पुन्हा एकदा गुगलवर जा पीएम किसान सन्मान निधी असं सर्च करा. मग स्क्रीनवर दिसणाऱ्या वेबसाईटवर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. आता तुम्हाला उजव्या बाजूला तीन ऑप्शन दिसतील. त्यातील शेवटचा नो युअर स्टेट्स या क्लिक करा. आता नवीन पेज ओपन होईल. त्यापेजवरच्या नो युअर रजिस्ट्रेशन नंबर ऑप्शनवर क्लिक करा. आता नवीन पेज ओपन होईल. त्यावर मोबाइल नंबरच्या रकण्यात मोबाइल नंबर टाका. बाजूला दिसणारा कॉपच्या समोरच्या रकाण्यात टाका. गेट ओटीपीला क्लिक करा. तुमच्या मोबाइल नंबर ओटीपी येइल. तो ओटीपीच्या रकान्यात टाका. गेट डिटेल्सच्या ऑप्शनवर क्लिक करा. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर स्क्रीनवर दिसेल. आता तो बाजूला कागदा लिहून घ्या. किंवा कॉपी करा. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मिळालाय. आता परत पीएफएमएसच्या वेबसईटला जायचं. म्हणजे आधी जी वेबसाईट ओपन केली होती त्यावर जायचं. वरच्या बाजूच्या पेमेंट स्टेट्सवर क्लिक करायचं. डीबीटी स्टेट्स ट्रॅकरचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. आता पहिल्यांदा कॅटेगरी क्लिक करून डीबीटी NSMNY portal ऑप्शन सलेक्ट करा. आता तुम्ही जो रजिस्ट्रेशन नंबर लिहून किंवा कॉपी केलाय. तोच इथं अप्लीकेशन आयडीच्या रकाण्यात टाकायचा. त्यानंतर डीबीटी स्टेट्समध्ये पेमेंट या ऑप्शनला सिलेक्ट आहे का ते बघा. नसेल तर सिलेक्ट करा. आता कपच्या वर्ड व्हिरीफीकेशनच्या रकाण्यात टाका. आता जांभळ्या कलरच्या सर्च बटनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर काही सेकंदात खाली पेमेंट डिटेल्स दिसतील. स्क्रोल करा. खाली तुम्हाला व्हलिडेशन स्टेट्समध्ये तारीख, फंड स्टेट्‍स, अमाऊंट दिसेल. पैसे कधी जमा झाले. वेळ काय होती, तारीख काय होती त्याची नेमकी माहिती मिळेल. क्रेडिट स्टेट्सवर जाऊन तुम्ही पाहू शकता की, तुमचं पेमेंट झालं आहे की, पेडीग आहे. पेडिंग दाखवत असेल तर प्रोसेस झालेली आहे. फक्त जमा होण्यासाठी वेळ लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com