Poultry Management: पावसाळ्यात कोंबड्यांच्या बैठकीची काय काळजी घ्यावी?
poultry management in rainy season: कुक्कुट खाद्यातील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे याचा थेट परिणाम पक्ष्यांच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर होतो आणि त्यामुळे श्वसन व अन्ननलिकेचे रोग वाढतात, तर काही वेळा पक्षी मृत्युमुखीही पडतात. अंडी उत्पादनातही घट होते. त्यामुळे पावसाळ्यात कुक्कुटपालकांनी विशेष दक्षता घेणं अत्यंत आवश्यक आहे.
बैठक व्यवस्थापन व स्वच्छतेसाठी सूचना
गादी पद्धतीने संगोपन केल्या जाणाऱ्या कुक्कुटगृहात पक्ष्यांसाठी उंचावरील बैठक व्यवस्था (प्लॅटफॉर्म) असावी. यामुळे जमिनीतील ओलाव्यापासून संरक्षण मिळेल, तसेच पायांना इजा किंवा संसर्ग होणार नाही.
पावसाळ्यात पक्ष्यांची जास्त गर्दी, छतामधून होणारी गळती आणि पक्ष्यांची विष्ठा यामुळे गादीचे तूस ओले होण्याची शक्यता असते. तसेच ओलसर गादीमुळे पेंड तयार होतो आणि पक्ष्यांच्या पायांवर जखमा होऊ शकतात. त्यामुळे पक्षीगृहातील संख्या मर्यादित ठेवणे, नियमित साफसफाई करणे आणि गादी कोरडी ठेवणे आवश्यक आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.