Monsoon Rain: राज्यात काही ठिकाणी पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Monsoon in Maharashtra: आज मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापत पुढे वाटचाल केली आहे. यासोबतच मॉन्सूनने झारखंड, बिहार आणि गुजरातच्या बहुतांश भागातही प्रवेश केला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या मॉन्सूनच्या सरी कोसळत असून, पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

rain alert in Maharashtra: राज्यात मॉन्सून सक्रीय झाल्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणातील काही भागांमध्ये आज आणि उद्या जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट लागू आहे. कोल्हापूर, सातारा आणि पुण्याच्या घाटमाथ्यावरही काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत पुढील तीन दिवस काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com