Plastic Impact: प्राण्यांच्या प्रजनन क्षमतेवर प्लॅस्टिकचा घातक परिणाम

animal health: प्लॅस्टिक प्रदूषण ही आजच्या काळातील एक अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब बनली आहे. टिकाऊपणा आणि कमी खर्चामुळे प्लॅस्टिकचा वापर जगभर झपाट्याने वाढत आहे. मात्र हेच प्लॅस्टिक विघटनास अत्यंत धीम्या गतीने जाणारे असल्याने माती, पाणी आणि हवेच्या प्रदूषणाचे मुख्य कारण ठरत आहे. याचा विपरीत परिणाम मानवासह प्राणी आणि निसर्गावरही होत आहे. समुद्रात टाकलेले प्लॅस्टिक मासे, कासव, पक्षी यांच्यासाठी घातक ठरत आहे. एवढंच नव्हे तर, सूक्ष्म प्लॅस्टिक मानवी शरीरात प्रवेश करून आरोग्याच्या दृष्टीने गंभीर धोका निर्माण करत आहे.

impact of plastic on livestock: जनावरांवर प्लॅस्टिकचा दुष्परिणाम

आजच्या यांत्रिक जीवनशैलीत प्लॅस्टिकचा वापर अनिवार्य झाला आहे. मात्र याचे दुष्परिणाम केवळ मानवापुरते मर्यादित राहिलेले नसून, पाळीव व रानटी प्राणी, पक्षी, जलचर यांनाही मोठ्या प्रमाणात याचा त्रास सहन करावा लागत आहे.

पचनसंस्थेवर होणारे परिणाम

प्राणी अनेकदा प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या किंवा प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेले अन्न खरे समजून गिळतात. हे प्लॅस्टिक त्यांच्या पोटात साचून पचनाचे विकार निर्माण करतो, कधी कधी भुकेने मृत्यूलाही कारणीभूत ठरतो. पोटात प्लॅस्टिक जमा झाल्यामुळे त्यांना भूक लागत नाही, ते अन्न कमी खातात, अशक्त होतात. मोठ्या प्लॅस्टिक तुकड्यांमुळे पचनमार्ग अडतो. काही वेळा सूक्ष्म प्लॅस्टिक शरीरात पसरते. उदा. नॉर्दर्न फुलमार नावाच्या पक्ष्याच्या पोटात नियमितपणे प्लॅस्टिकचे तुकडे आढळतात आणि त्याचे अंश त्यांच्या घरट्याजवळही सापडतात. या प्रकारामुळे अन्नसाखळीच्या माध्यमातून प्लॅस्टिक पुन्हा माणसांपर्यंत पोहोचते.

श्वसनास अडथळा

प्लॅस्टिकमध्ये अडकण्यामुळे पक्ष्यांचा श्वसनमार्ग बंद होतो, ऑक्सिजन कमी मिळाल्याने त्यांचा मृत्यू होतो. जलचर प्राणी प्लॅस्टिक पिशव्या व जाळ्यांमध्ये अडकून हालचाल करू शकत नाहीत. अशा अन्न व हवेअभावी ते तडफडून मरतात. काहीवेळा प्लॅस्टिक गिळल्यामुळे श्वसनमार्ग अडतो आणि वेळीच उपचार न मिळाल्यास मृत्यू होतो. डॉल्फिन, कासव, व्हेल यांच्यात असे प्रकार वारंवार दिसून येतात.

प्रजननावर परिणाम

मादी प्राण्यांमध्ये माज चक्रात बिघाड, अंडोत्सर्जनात अडथळा, गर्भधारणेचे प्रमाण कमी होणे दिसून येते. नरांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता व संख्येत घट, वंध्यत्वाची शक्यता निर्माण होते.

गर्भधारणेतील गुंतागुंती

सूक्ष्म प्लॅस्टिक गर्भाशयात गेल्यास भ्रूणविकासावर वाईट परिणाम होतो. काही प्राण्यांमध्ये अपूर्ण वाढ, मृत भ्रूण किंवा जन्मजात दोष दिसून येतात.

प्रयोगातून मिळालेली माहिती

प्रयोगशाळेतील उंदीर, मासे आणि कोंबड्यांवर केलेल्या अभ्यासात सूक्ष्म प्लॅस्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट झाल्याचे आढळले आहे.

रासायनिक परिणाम

पर्यावरणात विखुरलेले प्लॅस्टिक लहान प्राणी व कीटक अन्न समजून गिळतात. हे प्लॅस्टिक त्यांच्या शरीरात जमा होऊन विषारी रसायनांचा परिणाम पुढील अन्नसाखळीतील प्रत्येक स्तरावर होतो आणि शेवटी माणसांपर्यंत पोहोचतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com