Hailstorm Prediction: राज्यात आठ जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा

हवामान विभागाने मंगळवारी आणि बुधवारी राज्यातील काही ठिकाणी गारपीटीचा इशारा दिला. तर राज्यातील अनेक भागात पुढील ५ दिवसांमध्ये ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली. दुसरीकडे राज्यातील काही भागात तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटकाही वाढला.

हवामान विभागाने मंगळवार आणि बुधवारी राज्यातील काही भागात गारपीटीचा इशारा दिला आहे. तसेच, पुढील पाच दिवस राज्यभर ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही भागांमध्ये तापमान वाढल्याने उन्हाची तीव्रताही जाणवू लागली आहे. मंगळवारी जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात गारपीट, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा संभवतो. बुधवारी पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, तर गुरुवारी गोंदिया जिल्ह्यात गारपीटीचा अंदाज आहे. मराठवाड्यात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून विजांचा कडकडाट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, बुलडाणा, अमरावतीसह अनेक जिल्ह्यांमध्ये बुधवार ते शनिवार दरम्यान पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पुढील पाच दिवस विजांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com