Agriculture Pumps: शेतकऱ्यांना पुढच्या ५ वर्षांसाठी मोफत वीज मिळणार

Government Order: सरकारने शासन आदेशात म्हटले आहे की, जे शेतकरी ७.५ एचपीपर्यंत कृषी पंप वापरतात त्यांना मोफत वीज मिळेल. म्हणजेच ७.५ एचपीपेक्षा कमी क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोफत वीज मिळणार आहे.

Ajit Pawar: राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसकल्पात ही योजना जाहीर केली होती. राज्यातील पात्र शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी १४ हजार ७६० कोटी रुपयांचा खर्च शासनाला येणार आहे. पण या संपूर्ण रकमेचा भार आताच सरकार येणार नाही. कारण सरकार आधीच कृषीला सवलतीच्या दरात वीज देत होते. त्यासाठी सरकार जवळपास ७ हजार कोटी रुपये अनुदान देत होते. त्यात आता जवळपास एवढीच रक्कम सरकारला आणखी टाकावी लागेल, असेही सरकारने जीआरमध्ये म्हटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com