Land Conflict: लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने मुलाकडून घेतली जमीन परत

land dispute Latur: तुम्ही कधी ना कधी वयोवृद्ध आई-वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या मुलांची एखादी गोष्ट ऐकली असेल, किंवा अशा कथानकावर आधारित एखादा हिंदी सिनेमा पाहिला असेल. लहान असताना आई-वडील आपल्या लेकरासाठी रात्रंदिवस झटत असतात. पण एकदा पोरगं मोठं झालं की, तेच आईवडील त्याला ओझं वाटायला लागतात. मग तो त्यांना घराबाहेर काढतो. पण जर प्रशासनातील अधिकारी कर्तव्यदक्ष असतील, तर अशा पोरांकडून त्यांच्या वडिलांची मालमत्ता परत मिळवून देणं शक्य होतं. आणि ही गोष्ट केवळ कल्पना नाही, तर लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या शेडोळ गावात प्रत्यक्ष घडली आहे. याचीच माहिती आपण खालील व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत.

rural India family dispute: निलंगा येथील उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी एका वृद्ध शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला. शेडोळ येथील ७८ वर्षीय माधव गणपती धुमाळ यांच्या घरी स्वतः जाऊन त्यांनी त्यांची जमीन परत केली. धुमाळ यांच्याकडे एकूण ९२ गुंठे जमीन होती. त्यांनी यातील ५२ गुंठे दोन्ही मुलांना वाटून दिली, आणि उर्वरित ४० गुंठे स्वतःकडे ठेवली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com