El Nino 2027: पुढील मान्सूनमध्ये एल निनोचा प्रभाव राहणार? २०२७ च्या पावसाबाबत तज्ज्ञांचा अंदाज

EL Nino Impact on Monsoon: २०२६ मधील एल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या मान्सूनवर परिणाम झाल्याची चर्चा आहे. आता २०२७ च्या मान्सूनवरही एल निनोचा प्रभाव राहणार का, पुढील वर्षी पाऊस कमी पडणार का, असे प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत. हवामानविषयक चर्चेत २०२७ च्या मान्सूनदरम्यान ENSO तटस्थ स्थिती राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ENSO तटस्थ स्थिती म्हणजे एल निनो किंवा ला निना यांचा ठळक प्रभाव नसलेली परिस्थिती. मात्र, मान्सूनचा अचूक अंदाज देण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान, इतर हवामान घटक आणि भारतीय हवामान विभागाचा अधिकृत अंदाज महत्त्वाचा ठरेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com