Gram Rate: हरभऱ्याची मागणी चांगली राहण्याचा अंदाज

Cotton Market: कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात दुपारपर्यंत ७५.१० सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे ५९ हजार ६४० रुपये प्रतिखंडीवर होते.

Garlic Rate: राज्यात लसणाचे भाव तेजीत आहेत. बाजारातील लसणाची आवक खूपच कमी आहे. सरासरीपेक्षा आवक जवळपास ३० टक्क्यांपर्यंत कमी असल्याचे व्यापारी सांगत आहे. केवळ राज्यातच नाही तर देशभरात लसणाचा पुरवठा कमी आहे. पण दुसरीकडे लसणाची मागणी टिकून आहे. त्यामुळे लसणाचे भाव मागील काही महिन्यांपासूनच तेजीत आहेत. सध्या लसणाला गुणवत्तेप्रमाणे १४ हजार ते २० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. लसणाचा पुरवठा आणखी काही महीने कमी राहू शकतो. त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com