Farmer Loan: देशभरातून शेतकरी कर्जमाफीची मागणी

Revanth Reddy: महाराष्ट्र शेजारच्या तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी घोषणेनुसार तेलंगणातील ७० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात गुरुवारी ४ वाजेपर्यंत प्रत्येकी १ लाख रुपये जमा करण्याची घोषणा केली.

Budget 2024: निर्मला सितारामन २३ जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्ममधील पहिलाच अर्थसंकल्प असल्याने शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा आहेत. देशातील बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे. पंजाब, झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी करावी अशी मागणी करत आहेत. देशात २००८ सालानंतर शेतकरी कर्जमाफी झालेली नाहीय. त्यामुळं देशातील बहुतांश राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी लावून धरलीय. अलीकडेच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी तेलंगणातील शेतकऱ्यांची १५ ऑगस्टपर्यंत २ लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा केलीय. त्यामुळं शेतकरी कर्जमाफीचं लोण देशभर पसरू लागलं आहे. पंजाब, हरियाणा झारखंडसोबतच महाराष्ट्रातही कर्जमाफीची मागणीनं जोर धरला आहे. संयुक्त किसान मोर्चा अराजकीयनं कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी आक्रमक भूमिका घेतलीय. तर राज्यात मागच्या आठवड्यात संपलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत विरोधीपक्षनेत्यांनी राज्यातील शेतकरी कर्जमाफीची मागणी केलीय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com