Milk Benefit: दुधामध्ये कोणते घटक असतात?

Milk components: भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश आहे. दुग्धव्यवसाय केवळ अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग नसून, तो पोषण सुरक्षेलाही हातभार लावतो. दूध उत्पादनाबरोबरच भारताने दुग्धप्रक्रिया उद्योगातही लक्षणीय प्रगती केली आहे. दुधाचे उत्पादन, प्रक्रिया आणि वितरण यामुळे आरोग्यदायी, पर्यावरणपूरक व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पर्याय उपलब्ध झाला आहे.

Health benefits of milk: भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात भारतात सुमारे २३६.३५ दशलक्ष टन दूध उत्पादन झाले. जागतिक पातळीवर २०२३ मध्ये दूध उत्पादन ९६५.७ दशलक्ष टन होते, ज्यामध्ये भारताचे योगदान जवळपास २४.५ टक्के होते. मागील वर्षांच्या तुलनेत ही एकूण उत्पादकतेत १.५ टक्क्यांची वाढ होती. भारताच्या दूध उत्पादनात उत्तर प्रदेश हे आघाडीवर असून त्याचे राष्ट्रीय उत्पादनात योगदान सुमारे १६.२१ टक्के आहे. महाराष्ट्र सुमारे १६.०५ दशलक्ष टन दूध उत्पादनासह त्याचे राष्ट्रीय योगदान ६.७१ टक्के आहे. दूध उत्पादनात वाढ होण्यामागे शेतीपूरक व्यवसाय, सहकारी संस्था, आणि सरकारी योजनांचा मोठा वाटा आहे. भारतातील बहुतांश दूध गायी आणि म्हशींपासून मिळते. दूध हे नैसर्गिकरीत्या संपूर्ण अन्न मानले जाते. त्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे सर्व प्रमुख अन्नघटक – फॅट, प्रथिने, साखर (लॅक्टोज), जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. हे घटक सहज पचतात व शरीरासाठी उपयुक्त ठरतात.

दुधातील घटक आणि त्यांचे फायदे

१. पाणी (87 – 88%):- शरीरातील द्रव संतुलन राखते. इतर घटक पचनास मदत करतात.

२. स्निग्ध पदार्थ (फॅट) (3.5 – 6.5%)

1 ग्रॅम फॅट 9 कॅलरी ऊर्जा देतो.

जीवनसत्त्वे A, D, E, K यांना शरीरात शोषून घेण्यासाठी आवश्यक.

मेंदू व मज्जासंस्थेसाठी फायदेशीर फॉस्फोलिपिड्स पुरवतो.

म्हशीच्या दुधात फॅटचे प्रमाण अधिक असते.

३. प्रथिने (3.0 – 3.5%)

1 ग्रॅम प्रथिन 4 कॅलरी ऊर्जा देतो.

८०% केसिन व २०% व्हे प्रथिने.

आवश्यक अमिनो आम्लांनी युक्त.

संपूर्णपणे पचते.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

म्हशीच्या दुधात अधिक प्रमाण.

४. दूध साखर – लॅक्टोज (4.5 – 5%)

ऊर्जा प्रदान करते.

लहान आतड्यात लॅक्टेस एंझाइमद्वारे पचते.

मोठ्या आतड्यात उपयुक्त जिवाणूंना कार्बन स्रोत मिळतो.

गाई व म्हशीच्या दुधात प्रमाण जवळपास सारखे.

५. खनिजे (0.7 – 0.8%)

कॅल्शिअम, फॉस्फरस – हाडांसाठी आवश्यक.

झिंक, मॅग्नेशियम, सोडियम, कॉपर यांसारखी खनिजे शरीरातील विविध क्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

म्हशीच्या दुधात कॅल्शिअम व मॅग्नेशिअम अधिक; गाईच्या दुधात पोटॅशिअम आणि क्लोराईड अधिक.

६. जीवनसत्त्वे (अल्प प्रमाणात)

जीवनसत्त्व अ – डोळे व त्वचेसाठी.

जीवनसत्त्व ब गट – चयापचय व मज्जासंस्थेसाठी.

जीवनसत्त्व ड – हाडे व कॅल्शिअम शोषणासाठी.

जीवनसत्त्व इ – अँटीऑक्सिडंट.

म्हशीच्या दुधात अ आणि B6 अधिक, गाईच्या दुधात इ अधिक.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com