Central Team: केंद्रीय पथक नाशिक दौऱ्यावर

Onion Market: कांदा उत्पादन, उत्पादन खर्च, बाजारभाव, कांदा निर्यात समस्या सोबतच ‘नाफेड, एनसीसीएफ’ कांदा खरेदी आणि त्यामधील गैरप्रकार या बाबतची माहिती पथकाकडून घेतली जातेय.

Onion Market: कांदा खरेदी पारदर्शकता नसल्यानं गैरप्रकारावर अधिकारी पांघरून घालतात. कांदा उत्पादकांना रास्त भाव मिळण्याऐवजी काही ठरावीक व्यापाऱ्यांसंबंधी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ मालामाल झालेत. ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या संस्था उत्पादकांऐवजी व्यापाऱ्यांकडूनच जास्त कांद्याची खरेदी केली जाते. शेतकऱ्यांकडून १५ ते २० रुपये किलो दरानं खरेदी करून व्यापारी ३० रुपयांनी खरेदी दाखवली जाते, अशा अडचणीचा पाढा शेतकऱ्यांनी पथकासमोर वाचून दाखवला. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या द्वारका येथील मुख्य कार्यालय सभागृहात बुधवारी (ता. ३) पथकानं शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या वेळी प्रतिनिधींनी पथकासमोर तक्रारींचा पाढा वाचला. यासंबंधी सूचना आणि अहवाल केंद्राकडे सादर करण्याचं आश्‍वासन केंद्रीय पथक प्रमुख बी. के. पृष्टी यांनी दिल्यात. २०२३ च्या नोव्हेंबर महिन्यात केंद्रीय पथकानं कांदा उत्पादक पट्ट्यात पाहणी केली होती. पाहणी करून पथकानं केंद्र सरकारला पाहणी अहवाल सादर केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी घातली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली गेली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com