Goat Sheep: शेळी, मेंढीमध्ये कोक्सिडिओसिसचे कारणीभूत घटक कोणते?

livestock health: कोक्सिडिओसिस हा मेंढ्या व शेळ्यांमध्ये आढळणारा एक महत्त्वाचा परजीविजन्य आजार आहे. हा आजार आयमेरिया नावाच्या परजीवीमुळे होतो. हा परजीवी जनावरांच्या आतड्यांमध्ये वाढतो, ज्यामुळे त्यांच्या पचन प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. या परजीवीची अंडी, म्हणजेच ओसिस्ट्स, जनावरांच्या विष्ठेमार्फत बाहेर पडतात आणि त्यामुळे चारा व पाणी दूषित होते. हे दूषित अन्न किंवा पाणी सेवन केल्यास इतर जनावरांनाही आजार होण्याची शक्यता वाढते. विशेषतः ४ ते ६ आठवड्यांचे लहान करडे व कोकरे यांना हा आजार अधिक तीव्रपणे बाधित करतो. योग्यवेळी उपचार न केल्यास जनावरांचा जीव जाण्याची शक्यता असते.

coccidiosis symptoms: आजाऱ्याची कारणं:

१. अस्वच्छता – गोठ्यामध्ये साफसफाईचा अभाव, विष्ठा साचणे, दूषित पाणी किंवा चारा यामुळे संक्रमणाची शक्यता वाढते.

२. अतिगर्दी – एकाच जागी अनेक जनावरे ठेवल्यास परजीवींचा प्रसार लवकर होतो.

३. पोषणातील कमतरता – योग्य पोषण न मिळाल्यास पचनक्रिया आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, परिणामी आजार लवकर होतो.

४. ताणतणाव – दूध देणे, गर्भधारणा, हवामानातील बदल यामुळे निर्माण होणारा ताण रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com