Release Deed: तुम्ही हक्कसोडपत्र रद्द करू शकता का?

What is property release deed: तुमच्या नावावर एखादी मालमत्ता असेल किंवा तुम्ही एखाद्या मालमत्तेमध्ये हिस्सेदार असाल आणि तुमच्याकडे तुमचे नातेवाईक हक्कसोड पत्र मागत असतील तर यातील कायदेशीर बाबी माहिती असणे आवश्यक आहे.

How to make a Hakk Sodpatra: हक्कसोडपत्र कोण तयार करू शकते? 

केवळ मालमत्तेचे सामाईक हिस्सेदार मालमत्तेतील त्यांचा हिस्सा सोडू शकतात. तसेच, ते केवळ त्या विशिष्ट मालमत्तेच्या दुसऱ्या सहमालकाच्या हक्कात त्यांचा हक्क सोडू शकतात, इतर कोणीही नाही.

 मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल 

पुरावा म्हणून न्यायालयात दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी न केलेले हक्कसोडपत्र स्वीकार्य नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या निकालानुसार, वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेसाठी हक्क सोडपत्र कायद्याच्या न्यायालयात मान्य होण्यासाठी नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. वारसा मिळालेल्या मालमत्तेच्या बाबतीत, केवळ हक्कसोडपत्र असणे पुरेसे नाही. पुरावा म्हणून न्यायालयात मान्य होण्यासाठी हक्कसोडपत्राची सक्षम दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे.

हक्क सोडपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे 

मालमत्तेची कायदेशीर कागदपत्रे,मालमत्तेची नोंदणीकृत कागदपत्रे, लेखी दस्त ,सर्व सह्दायकांचा तपशील. एकदा नोंदणीकृत झालेले हक्कसोडपत्र सामान्य परिस्थितीमध्ये रद्द केले जाऊ शकत नाही. १९०८ च्या नोंदणी कायद्यांतर्गत हक्कसोडपत्राची नोंदणी झाल्यानंतर तुम्ही निर्णय बदलू शकत नाही. परंतु, तो फक्त पुढील परिस्थितीतच रद्द केला जाऊ शकतो.

जर तुम्हाला हक्क सोडपत्र करण्यास तुमच्या मर्जीच्या विरुद्ध भाग पाडले किंवा प्रभावित केले असेल तर.जर तुमची हक्कसोडपत्र घेण्यासाठी फसवणूक झाली असेल तर.जर हक्कसोडपत्रात चुकीचा मजकूर लिहिला गेला असेल तर.हक्कसोडपत्रात विसंगती असल्यास. संपूर्ण माहिती पाहण्यासाठी वरील व्हिडिओ जरूर बघा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com