BBF Technology: बीबीएफ तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान

Broad Bed Furrow method: विदर्भासह महाराष्ट्रातील बहुतांश कोरडवाहू भागांमध्ये खरीप हंगामात सोयाबीन हे एक महत्त्वाचं नगदी पीक बनलं आहे. मात्र हे पीक पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्यामुळे पावसाच्या अनिश्चित आणि अनियमततेमुळे उत्पादनावर मोठा परिणाम होतो. या समस्येवर मात करण्यासाठी रुंद वरंबा सरी (BBF) तंत्रज्ञान अत्यंत प्रभावी ठरत आहे. तर BBF तंत्रामध्ये अलीकडे कोणते सुधारित तंत्र आले आहेत? या तंत्राचे फायदे काय आहेत? याची सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओतून मिळणार आहे.

BBF farming benefits: अलीकडच्या काळात हवामानातील बदलामुळे पावसाचा अंदाज चुकतो आहे. कधी अति पाऊस तर कधी पावसाचा दीर्घ खंड निर्माण होतो. अशा दोन्ही परिस्थितीत पीक तग धरावे, यासाठी जमिनीतील ओलावा टिकवणे आणि पाण्याचा निचरा नीट होणे आवश्यक असते. मात्र अनेक शेतकऱ्यांना यासाठी योग्य तंत्रज्ञान आणि माहिती उपलब्ध नसल्याने उत्पादनात घट होते. या तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कोरडवाहू शेती संशोधन केंद्रातील संशोधक गेल्या काही वर्षापासून सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांनी एकात्मिक कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प (RIFS) अंतर्गत विस्तार कार्यक्रमामध्ये रुंद वरंबा सरी (BBF) तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रात्यक्षिकांचे आयोजन शेतकऱ्यांच्या शेतावर केले होते. गतवर्षी राबवलेल्या या कार्यक्रमांतून अनेक यशकथा निर्माण झाल्या.

बीबीएफ आधारीत सुधारीत तंत्रज्ञान

मध्यम काळी जमीन निवडावी.

एक नांगरट करून दोन कुळवाच्या पाळ्या देऊन भुसभुशीत करावी.

रायझोबियम, ट्रायकोडर्मा, स्फुरद विरघळवणारे जिवाणू यांच्या मिश्रणाचा वापर करून सोयाबीन बियाण्यांची प्रक्रिया करावी.

BBF यंत्राद्वारे मुग, उडीद, मका, भुईमूग, कपाशी, ज्वारी यासारख्या ४५ सें.मी. अंतराच्या पिकांची पेरणी करता येते.

सोयाबीन पेरणी ४५ x १० सेमी अंतरावर ट्रॅक्टरचलित बीबीएफ यंत्राने करता येते.

सोयाबीन पेरणी ४५ x १० सेमी अंतरावर ट्रॅक्टरचलित बीबीएफ यंत्राने करता येते.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेले PDKV-अंबा, PDKV-सुवर्ण, PDKV-यलो गोल्ड हे वाण वापरावेत.

बीज प्लेटच्या साहाय्याने योग्य खोलीवर पेरणी होते, त्याच वेळी खतेही टाकता येतात.

यंत्रात रिज तयार करण्याची सोय असल्यामुळे सरी व वरंबा निर्माण होतो.

बीबीएफ तंत्राचे फायदे

अधिक पावसात: सरींमधून अतिरिक्त पाणी निचरा होते. त्यामुळे मुळांजवळ पाणी साचत नाही.

कमी पावसात: साठवलेला ओलावा मुळांपर्यंत पोहोचतो. पीक दीर्घ खंडातही तग धरते.

उत्पादनवाढ: बीबीएफ तंत्र वापरल्यास सरासरी उत्पादनात एकरी ३ ते ४ क्विंटल वाढ झाल्याचे प्रात्यक्षिकांतून दिसून आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com