पिवळी डेझी फूलपिकाची लागवड कशी करावी?

पिवळी डेझी लागवड
पिवळी डेझी लागवड
Published on
Updated on

पिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे. या वनस्पतीचा वापर प्रामुख्याने `फिलर मटेरिअल'' म्हणून करण्यात येतो. फुलांचे बुके/गुच्छ तयार करताना पिवळ्या डेझीचा वापर केला जातो. या फुलाला सॉलिडॅगो, गोल्डन रॉड, सोनतुरा असेही म्हणतात. लागवडीसाठी मध्यम किंवा हलक्‍या प्रकारातील उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून हेक्‍टरी १५ टन कुजलेले शेणखत मिसळावे. त्यानंतर लागवडीसाठी तीन मीटर लांब आणि दोन मीटर रुंद आकाराचे सपाट वाफे तयार करावेत किंवा सरी-वरंब्यावरदेखील लागवड करता येते. अभिवृद्धी सहजगत्या रोपाच्या कडेला फुटणाऱ्या फुटव्यांद्वारा करण्यात येते. फुटव्यांची लागवड ३० x ३० सें.मी. किंवा ५० x ५० सें.मी. अंतरावर करावी. सरी-वरंब्यावर लागवड करताना ५० सें.मी. अंतर ठेवून रोपांतील अंतर ३० सें.मी.पर्यंत ठेवावे. शक्‍यतो संध्याकाळच्या वेळी मुनवे लावावेत. रोपांच्या जोमदार वाढीसाठी माती परीक्षणानुसार दरवर्षी हेक्‍टरी ८० किलो नत्र, ८० किलो स्फुरद आणि ८० किलो पालाश ही खतमात्रा द्यावी. नत्राची मात्रा दोन समान हप्त्यांत विभागून लागवडीनंतर चार महिन्यांच्या अंतराने द्यावी. दर चार महिन्यांनी पिकाची खांदणी करून नत्र खताची मात्रा द्यावी. लागवडीनंतर ४० ते ५० दिवसांनी फुले येण्यास सुरवात होते. वर्षभर फुले येत राहतात. डेझीची फुले दांड्यासह काढावीत. संपर्क : ०२०- २५६९३७५० राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com