हिवाळ्यात आरोग्य, पोषणासाठी बाजरी

ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या धान्याचा वापर कमी झाला आहे. ही पिके पचनसंस्थेच्या दृष्टीने व एकूण आरोग्यासाठीही महत्त्वाची आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये बाजरी या धान्याचे फायदे अधिक आहे.
हिवाळ्यात आरोग्य, पोषणासाठी बाजरी
हिवाळ्यात आरोग्य, पोषणासाठी बाजरी
Published on
Updated on

अलीकडे अगदी ग्रामीण भागातही गहू खाण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या धान्याचा वापर कमी झाला आहे. ही पिके पचनसंस्थेच्या दृष्टीने व एकूण आरोग्यासाठीही महत्त्वाची आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये बाजरी या धान्याचे फायदे अधिक आहे. सर्व तृणधान्यात जास्तीत जास्त ऊर्जा देणारी बाजरी थंडीच्या दिवसांत आहारात असावी. बाजरीमध्ये सल्फरयुक्त अमिनो आम्ल असल्याने लहान मुले व गर्भवती मातांसाठी बाजरी अतिशय उपयुक्त आहे. गहू आणि मैद्याचा वापर असलेले बेकरी पदार्थांचा लहान मुलांच्या आहारात अधिक समावेश होत आहे. यामुळे लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे यांसारखे आजार वाढले आहेत. महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, ग्लुटेनची ॲलर्जी उद्‍भवणे अशा समस्याही दिसत आहेत. त्या टाळण्यासाठी आहारात बाजरीचा समावेश करणे हिताचे ठरते. बाजरीच्या १०० ग्रॅम दाण्यातील पोषक घटक प्रथिने -१०.६ %, पिष्ठमय पदार्थ -७१.६ %, स्निग्ध पदार्थ -५%, तंतुमय पदार्थ -१.३%, कॅल्शिअम- ३०%, लोह ८ मि.ग्रॅ., जस्त -५ मि.ग्रॅ. कॅलरी -३६० फायदे ः

  • बाजरी हिवाळ्यात शरीर उबदार ठेवते.
  • अधिक ऊर्जा देत असल्याने शारीरिक कष्टाची कामे करणाऱ्या लोकांसाठी बाजरी ही अधिक फायदेशीर ठरते.
  • कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवते. परिणामी, हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो. याशिवाय बाजरी मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमचा चांगला स्रोत असून, त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
  • बाजरीची भाकरी खाल्ल्याने दीर्घकाळ पोट भरल्याची भावना राहते. परिणामी, वजन कमी करण्यासाठी ती उपयुक्त ठरू शकते.
  • पिवळसर बाजरीमध्ये कॅरोटीन व ‘अ’ जीवनसत्त्व अधिक असते.
  • बाजरीचे विविध पदार्थ ः

  • बाजरीच्या भाकरीसोबत गुळाचा खडा व तूप हे ग्रामीण भागातील लोकांमध्ये लोकप्रिय आहे. बाजरी भाकरीसोबत उडदाच्या डाळीची आमटी हा हिवाळ्यातील अतिशय पौष्टिक आहार आहे.
  • भारतीय खाद्यपदार्थात बाजरीच्या पिठाची भाकरी किंवा धपाटे हा मुख्य पदार्थ आहे.
  • गव्हाच्या पिठासोबत वापरल्यास प्रथिनांची उपलब्धता वाढते. रंग व स्वाद सुधारल्याने बेकरीमध्ये त्याचा वापर करता येऊ शकतो.
  • पारंपरिक पदार्थ- भाकरी, खिचडी, चुरमा, धपाटे, शेव लाडू, बर्फी
  • बेकरी पदार्थ – बिस्कीट, नानकटाई, खारी.
  • बाजरीचा वापर गृहिणी विविध खाद्य पदार्थांमध्ये सोबत केल्यास वैशिष्ट्यपूर्ण व उत्तम चव मिळू शकते. घरगुती स्तरावर लघुउद्योग करता येईल. बाजरीच्या पोषण मूल्यांचा फायदा आपल्या कुटुंबीयांना आरोग्य सुधारण्यास होईल.
  • (कार्यक्रम सहायक, कृषी विज्ञान केंद्र, वाशीम),  

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com