Tractor Market : 40-50 एचपीच्या ट्रॅक्टरची विक्री का वाढतेय ?

सोबतच शेतीव्यतिरिक्त इतर कामांमध्येही या ट्रॅक्टरचा वापर होतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्नाचे स्रोत वाढवता येतायत.
Tractor Market In India
Tractor Market In IndiaAgrowon

40 ते 50 हॉर्स पॉवरच्या रेंजमधील ट्रॅक्टरची (Tractor) सर्वाधिक विक्री होत असल्याचं TractorJunction.com या शेती उपकरणांसाठी असलेल्या डिजिटल मार्केट प्लेसच्या (Digital Market Place) निवेदनात म्हटलंय.

ट्रॅक्टर जंक्शनचे संस्थापक रजत गुप्ता यांनी निवेदनात असं म्हटलंय की, "शेतकरी आता आपल्या गरजेनुसार आणि वापरानुसार ट्रॅक्टरची खरेदी करतायत. बहुसंख्य शेतकऱ्यांकडे 2-3 हेक्‍टरपेक्षा कमी शेतजमिनी असल्याने 40 ते 50 हॉर्स पॉवरचे ट्रॅक्टर घेण्याकडे त्यांचा कल वाढलाय.

हे ट्रॅक्टर कॉम्पॅक्ट आणि स्टँडर्ड सेगमेंटमध्ये येतात. यांचा वावर नांगरणी आणि मशागतीच्या कामांसाठी केला जातो. सोबतच शेतीव्यतिरिक्त इतर कामांमध्येही या ट्रॅक्टरचा वापर होतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्नाचे स्रोत वाढवता येतायत."

40 ते 50 हॉर्स पॉवर असलेल्या या ट्रॅक्टर्समध्ये 10 मॉडेल्स आहेत. यात M&M 575 – 47 HP या मॉडेलची सर्वाधिक विक्री होत असल्याचं निवेदनात म्हटलंय.

भारतात महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीचे सर्वाधिक ट्रॅक्टर विकले जातात. महिंद्राच्या या ट्रॅक्टर्समध्ये खूप सारे सेगमेंटस आणि बरेचसे स्पेसिफिकेशन दिले जातात.

ट्रॅक्टर जंक्शनने दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टरचे सर्वाधिक वापरकर्ते उत्तरप्रदेशात आहेत. त्यानंतर मध्यप्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. टेलीमॅटिक्सवर आधारित ट्रॅक्टर, माती परीक्षण आणि शेतांचं निरीक्षण यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात ही राज्य आघाडीवर आहेत. यामुळे शेतीचं उत्पन्न आणि अन्नाचा दर्जा सुधारला असल्याचं ट्रॅक्टर जंक्शनच्या निवेदनात म्हटलंय.

ट्रॅक्टर जंक्शनवर जुन्या / नव्या ट्रॅक्टरची खरेदी विक्री करण्यात येते. सोबतच शेती उपकरणे, वित्तपुरवठा, विमा आणि सेवा पुरवण्यात येते. या ऑनलाइन मार्केट प्लेसवर 300 हून अधिक नवीन ट्रॅक्टर, 75 पेक्षा जास्त कापणी यंत्र, 580 अवजारं, 135 फार्म टूल्स आणि 120 प्रकारचे टायर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com