Agriculture Technology : शेतीमाल वाहतुकीसाठी दुचाकीची ट्रॉली

Trolley with Hydraulic System : नाशिक जिल्ह्यातील वळदगाव (शिरसगाव लौकी, ता. येवला) येथील जयेश व महेश या कानडे बंधूनी मोटारसायकलला जोडता येथील अशी हायड्रोलिक प्रणाली असलेली ट्रॉली तयार केली आहे.
Agriculture Trolley
Agriculture Trolley Agrowon

प्रमोद पाटील

Agricultural Transport : शेतकऱ्याला शेती करताना अनेक छोट्या मोठ्या गोष्टींची वाहतूक सातत्याने करावी लागते. त्यासाठी नुसती दुचाकीवर भागत नाही आणि दरवेळी भाड्याने गाडी घेणे परवडत नाही. या समस्येवर मात करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील वळदगाव (शिरसगाव लौकी, ता. येवला) येथील जयेश व महेश या कानडे बंधूनी मोटारसायकलला जोडता येथील अशी हायड्रोलिक प्रणाली असलेली ट्रॉली तयार केली आहे.

Agriculture Trolley
Agriculture Technology : आंतरमशागतीची आधुनिक अवजारे

ग्रामीण भागात दळणवळणाच्या सोयींचा अभाव असतो. शेती व्यवसायासाठी विविध निविष्ठा आणि उत्पादित मालाच्या वाहतुकीची समस्या उभी राहते. हे सामान दुचाकीवर नेणे शक्य नसते, आणि दरवेळी अन्य वाहन करणे महाग पडते, ही समस्या शेतकऱ्यांना नेहमीच भेडसावते. गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जाते. या अडचणीवर नाशिक जिल्ह्यातील वळदगाव (शिरसगाव लौकी, ता. येवला) येथील जयेश व महेश या कानडे बंधूनी चांगला उपाय शोधला आहे. त्यांनी मोटारसायकलला जोडता येथील अशी हायड्रोलिक प्रणाली असलेली ट्रॉली तयार केली आहे. कल्पनाशक्तीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यामुळे मालाची वाहतूक स्वस्तात करणे शक्य होत आहे.

Agriculture Trolley
Agriculture Technology : कृषी पर्यटन, शेती-प्रक्रिया उद्योगाचे प्रेरणादायी मॉडेल

...अशी आहे ही ट्रॉली

घरच्या जुन्या १०० सीसीच्या मोटरसायकलला नेवासा फाटा येथील कारागिराच्या साह्याने त्यांनी साडेपाच फूट बाय साडेचार फूट आणि १५ इंच उंची या आकाराची ट्रॉली बनवून घेतली. तिला लहान व्हॅन गाडीचे टायर वापरले आहेत. या ट्रॉलीतील माल खाली ओतण्यासाठी हायड्रोलिक प्रणाली बसवली आहे. त्याच प्रमाणे रिव्हर्स गियरची सोयही केली आहे. त्यामुळे पाच ते आठ क्विंटलपर्यंतचा शेतीमाल अगदी सहज बाजारापर्यंत नेता व उतरवता येतो.

...असा होतो उपयोग

कानडे कुटुंबीयांना शेती आणि दुग्ध व्यवसायही करत असताना निविष्ठा, कांद्याचे रोपे, जनावरांचा चारा, गवत, कॅरेट आणि शेतीमालाची वाहतूक सातत्याने करावी लागते. थोड्या मालासाठी छोटी गाडी करणे सामान्य शेतकऱ्यांना दरवेळी परवडत नाही. ही गाडी ३५ ते ४० किलोमीटर प्रति लिटर इतका ॲव्हरेज देते. त्यामुळे ही दुचाकीशी जोडली जाणारी ट्रॉली आम्हाला उपयोगी पडत असल्याचे महेश व त्यांचे वडील गोरख कानडे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com