डॉ.अभिनव सोनटक्के, डॉ. शॉरलेट रोड्रिक्स, डॉ. गौरी रेळे.AI Technology: भटक्या जनावरांमध्ये, श्वानांमध्ये प्रचलित असलेल्या रिफ्लेक्टिव्ह कॉलरचा वापर सध्या पाळीव प्राण्यांमध्ये केला जात आहे. चरण्यासाठी सोडलेल्या जनावरांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचा फायदा होतो. या कॉलरमध्ये कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञान जोडल्याने शेतकऱ्यांना जनावर चरण्याच्या पद्धत, त्यांची शारीरिक स्थिती आणि खाद्य सेवनाचे प्रमाणही समजते..असे आहे रिफ्लेक्टिव्ह कॉलर जनावरांच्या गळ्याभोवती लावलेल्या पट्ट्यामध्ये परावर्तकाचा वापर केला जातो. हा परावर्तक रात्रीच्या अंधारात प्रकाश पडल्यावर चमकतो, त्यामुळे अंधारात जनावर पटकन दिसते. सुरुवातीला या कॉलरच्या रचनेमध्ये जनावरांच्या मानेभोवती सैलपणे बांधलेल्या कापडावर एकच परावर्तक पट्टी लावलेली होती. त्यानंतर क्लिप्सच्या साहाय्याने व्यवस्थित बसवता येणाऱ्या परावर्तक कापडाचे कॉलर तयार करण्यात आले. यामुळे कॉलर सुटून पडण्याचे प्रमाण कमी झाले..रिफ्लेक्टिव्ह कॉलरची गरज वाहनांच्या हेडलाइट्सचा साधारणपणे २५ ते ५० फूट अंतरापर्यंत प्रकाश मिळतो. मात्र धुके, कुंद वातावरण किंवा रस्त्यावरील वळणांमुळे प्रकाशाचा झोत मोठ्या प्रमाणात कमी होतो. वाहनांच्या हेडलाइट्समध्ये सुधारणा झाल्या असल्या तरीही या परिस्थितीमध्ये रस्त्यावर भटकणारी जनावरे सहज दिसत नाहीत. ही जनावरे ओळखण्यासाठी ‘रिफ्लेक्टिव्ह कॉलर’चा वापर फायदेशीर ठरतो. .सुरुवातीला या कॉलरचा वापर प्रामुख्याने श्वानांसाठी केला जात होता. परंतु आता पाळीव प्राण्यांसाठी वापर वाढला आहे. या कॉलरमध्ये परावर्तक दोऱ्यांचा वापर केल्याने उपयुक्तता वाढली आहे. पशुपालक सकाळी लवकर जनावरांना चरण्यासाठी नेतात आणि रात्री उशिरा परत येतात. अशा परिस्थितीत माळरानावरील वादळे किंवा योग्य प्रकाशव्यवस्थेचा अभाव असल्यामुळे दृश्यमानता कमी असते, तेथे हे परावर्तक कॉलर अतिशय उपयुक्त ठरतात..Winter Livestock Care: थंडीमध्ये जनावरांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? .रिफ्लेक्टिव्ह कॉलरची निर्मितीभटकी जनावरे लगेच ओळखण्यासाठी रिफ्लेक्टिव्ह कॉलर निर्मिती करण्यात आली. पहिल्या टप्यांत कॉलरमध्ये लहान बल्ब आणि स्विच असलेला पट्टा असायचा. यामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यावर असलेले भटके जनावर सहज ओळखता येत होते. परंतु हे कॉलर निर्मिती वेळखाऊ, कष्टदायक होते. त्यातील बॅटरी बदलावी लागत असे. या अडचणी लक्षात घेऊन परावर्तक कॉलरची निर्मिती करण्यात आली. परावर्तक कॉलरच्या इतर काही रचनांमध्ये परावर्तक टेप, परावर्तक कापड वापरतात किंवा परावर्तक पदार्थावर पारदर्शक लॅमिनेटचा पट्टा लावता येतो. त्यानंतर तो प्रकाशमान रंगाने रंगवलेल्या दोरीवर बसवितात. आधुनिक परावर्तक कॉलर फास्टनर किंवा बक्कलच्या साहाय्याने सुरक्षितपणे बांधता येतात. या कॉलरच्या रचनेत विविध रंग आणि पर्यायी आकारातील टेप्स वापरून सुधारणा करण्यात आली. यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकाशामध्ये त्यांची कार्यक्षमता वाढली..रिफ्लेक्टिव्ह कॉलरचे फायदे १) रात्रीच्या अंधारात रस्त्यावर भटकणारी जनावरे ओळखण्यासाठी फायदेशीर.२) आधुनिक कॉलरच्या रचनेत विविध रंग, पर्यायी आकारातील टेप्स वापरून सुधारणा. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकाशातही कार्यक्षम.3) काही परावर्तक पदार्थांना रासायनिक किंवा उष्णतामूलक प्रक्रियेद्वारे कायमस्वरूपी कापडामध्ये एकत्र करण्यात आले आहेत. हे परावर्तक कॉलर अत्यंत उपयुक्त. ४) कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत भटकी जनावरे सहज ओळखता येतात. नर आणि मादी जनावरांमध्ये फरक ओळखण्यासाठी विविध रंगसंगतींचा वापर. ५) परावर्तक कॉलर घंटेसोबत जोडल्याने लोकांना आवाजाच्या आधारे जनावरांच्या उपस्थितीची कल्पना येते. ६) काही कॉलरमध्ये परजीवीविरोधात औषधे मिसळलेली असतात. ज्यामुळे परजीवींपासून जनावरांचे रक्षण करणे शक्य होते. युरोपातील काही देशांमध्ये अशा कॉलरचा वापर केला जातो..Agriculture Technology : काटेकोर शेतीसाठी विविध संवेदकांचा वापर.रिफ्लेक्टिव्ह कॉलरमध्ये एआय आणि क्यूआर कोडनव्या पिढीतील परावर्तक कॉलरमध्ये संबंधित जनावर आणि मालकांच्या माहितीचा समावेश असतो. काही परावर्तक कॉलरमध्ये क्यूआर कोड असतात. जे अॅपच्या माध्यमातून पशुपालक आणि जनावरांची माहिती पुरवू शकतात. यासोबत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान सोबत जोडल्यास जनावरांची हालचाल आणि दैनंदिन सवयींबद्दलची माहिती मिळणे सोपे जाते. हे कॉलर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानासोबत जोडल्यास जनावरांच्या चरण्याच्या पद्धती, शारीरिक स्थिती आणि खाद्य सेवनाचे प्रमाण याबाबत माहिती मिळविण्यासाठीही उपयुक्त ठरतात. काही परावर्तक कॉलरमध्ये क्यू आर कोड असतात, जे अॅपच्या माध्यमातून मालक आणि जनावरांची माहिती पुरवू शकतात..कॉलरचे आयुष्य आणि वापरतानाची दक्षता रिफ्लेक्टिव्ह कॉलरचे आयुष्य मर्यादित असते. कॉलर सतत वापरात असल्यामुळे त्याची झीज होते. मानेच्या भागावर घासल्यामुळे किंवा हवामानातील घटकांमुळे ते खराब होऊ शकतात. जास्तीत जास्त एक ते तीन वर्षांपर्यंत टिकतात आणि नंतर बदलावे लागतात. कॉलर खूप घट्ट बांधल्यास जनावराची चिडचिड होते किंवा मानेला जखम होऊ शकते. खूप सैल असल्यास कॉलर निसटून पडण्याची शक्यता असते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.