Poly Mulching in Agriculture : प्लॅस्टिक आच्छादनामुळे वाढतेय मातीचे प्रदूषण

Plastic Covering : कॅलिफोर्निया येथील स्ट्रॉबेरी लागवडीत प्लॅस्टिक आच्छादनाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे मातीमध्ये प्लॅस्टिकच्या सूक्ष्म कणांचे प्रदूषण वाढत असल्याचे वॉशिंग्टन येथील संशोधनातून समोर आले आहे.
Plastic Mulching
Plastic Mulching Agrowon

Soil Pollution : कॅलिफोर्निया येथील स्ट्रॉबेरी लागवडीत प्लॅस्टिक आच्छादनाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे मातीमध्ये प्लॅस्टिकच्या सूक्ष्म कणांचे प्रदूषण वाढत असल्याचे वॉशिंग्टन येथील संशोधनातून समोर आले आहे. या प्लॅस्टिक कणांचा जमिनीच्या आरोग्यावर दीर्घकालीन विपरित परिणाम होतो. याविषयी कॅलिफोर्निया पॉलिटेक्निक राज्य विद्यापीठातील पोस्ट डॉक्टरल संशोधक डॉ. एकता तिवारी यांनी ल्योन येथे आयोजित गोल्डश्मिट भू-रसायनशास्त्राच्या परिषदेत त्यांचे संशोधन सादर केले.

आपल्या संशोधनाबाबत माहिती देताना डॉ. तिवारी म्हणाल्या, की या अभ्यासासाठी आम्ही स्ट्रॉबेरी शेताचे सर्वेक्षण करून त्यातून जमिनीच्या वरील पृष्ठभागावरील मातीचे नमुने घेतले. या मातीच्या नमुन्यामध्ये प्रति हेक्टर सुमारे २ लाख १३ हजार ५०० प्लॅस्टिक कण आढळून आले आहेत. या विश्लेषणासाठी इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर करण्यात आला. थोड्या अधिक खोलीवरील नमुने घेतले असता त्याही पेक्षा अधिक प्लॅस्टिक कण आढळण्याची शक्यता आहे. कारण दरवर्षी स्ट्रॉबेरी उत्पादनामध्ये आच्छादन म्हणून वापरलेल्या प्लॅस्टिकचे ५ मि.मी. आणि त्या पेक्षा मोठे कण मोठ्या प्रमाणात मातीमध्ये मिसळतात. या कणांचे विघटन होत नसल्यामुळे दशकापेक्षा अधिक काळ तसेच जमिनीत राहतात.

Plastic Mulching
Plastic Mulching Types : प्लॅस्टिक आच्छादनाचे विविध प्रकार कोणते आहेत?

प्लॅस्टिकऐवजी सेंद्रिय आच्छादनाला प्राधान्य हवे ः
प्लॅस्टिक आच्छादनाचे पिकाच्या वाढीवर काही चांगले परिणाम होत असले, तरी त्यापासून होणाऱ्या दीर्घकालीन प्रदूषणामुळे अनेक समस्या उद्‍भवू शकतात. मातीच्या कणांमध्ये प्लॅस्टिक कणांचे प्रमाण वाढत गेल्यास त्याचा मातीतील ओलावा, सूक्ष्म जिवांच्या श्‍वसन प्रक्रियेवर विपरित परिणाम होतो. पिकांना उपलब्ध होणाऱ्या नत्राचे प्रमाण कमी होते. मातीमधून प्लॅस्टिकचे छोटे छोटो कण काढण्याचे काम अत्यंत कठीण आणि खर्चिक आहे. एकदा प्लॅस्टिक आच्छादन वापरल्यानंतर अनिश्‍चित काळासाठी हे कण जमिनीमध्ये पडून राहतात. त्यामुळे भविष्यात आच्छादनासाठी सेंद्रिय घटकांच्या वापरावर भर देणे अत्यंत आवश्यक आहे.

- सेंद्रिय आच्छादन काही काळानंतर कुजून त्यातून सेंद्रिय कर्बासह अनेक पोषक घटकांची पिकाला उपलब्धता होते.
- जमिनीचे तापमान नियंत्रित राखले जाते आणि जमिनीतील ओलावा टिकून राहतो. परिणामी पाण्याची बचत होते.
- वनस्पतीभोवती उपयुक्त सूक्ष्म जिवांची वाढ होऊन सूक्ष्म वातावरण निर्मिती होते. त्यामुळे प्रकाश संश्‍लेषणाचे क्रिया वेगाने आणि सुरळीत पार पडते.
- जमिनीची होणारी धूप थांबते, तणांची वाढ होत नाही.
- पिकाची उत्पादकता, फळांचे उत्पादन आणि दर्जा सुधारण्यास मदत होते.
(स्त्रोत ः वृत्तसंस्था)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com