Saffron Farming : पुण्यात नियंत्रित पद्धतीने घेतले ‘केशर’चे उत्पादन

महाराष्ट्रातील खुल्या वातावरणात येऊ न शकणारे, मात्र नियंत्रित आणि एअरोपोनिक पद्धतीने केशर उत्पादन घेण्याची नवी वाट शैलेश मोडक या युवकाने चोखळली आहे.
Saffron Farming
Saffron FarmingAgrowon
Published on
Updated on

पुणे : महाराष्ट्रातील खुल्या वातावरणात येऊ न शकणारे, मात्र नियंत्रित आणि एअरोपोनिक पद्धतीने केशर उत्पादन (Saffron Farming) घेण्याची नवी वाट शैलेश मोडक या युवकाने चोखळली आहे. एका बंदिस्त कंटेनरमध्ये थेट काश्‍मीरचे वातावरण (Kashmir Climate) निर्माण करून केशरचे पीक (Saffron Crop) घेण्याच्या आश्‍वासक प्रयोगाला पुण्यात श्री. मोडक यांनी यशस्वी केले आहे. इराण, भारतातही असे प्रयोग होत असताना, तो महाराष्ट्रातही झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

तोळ्यावर विकल्या जाणाऱ्या मसाल्यात केशरचे महत्त्व भारतीय अन्न पदार्थांत अत्यंत मोलाचे आहे. ३०० ते १५०० रुपयांपर्यंत दर्जानुसार केशरचा भाव बाजारात आपणास पाहावयास मिळतो. मात्र काश्मीर, हिमाचल आदी थंड, बर्फाळ प्रदेशातच केशर उत्पादन घेतले जात असले, तरी भारतातील केशर उत्पादन अगदी नगण्य आहे.

Saffron Farming
Agriculture Economy : आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यात परंपरेची आडकाठी ?

भारतीयांच्या मागणीच्या तुलनेत केवळ ३ ते ४ टक्केच उत्पादन आपल्याकडे घेतले जाते. बाकी ९६ टक्के केशर आयात केले जाते, ही संधी लक्षात घेत श्री. मोडक यांच्या प्रयोगाचे महत्त्वही मोठे आहे. शैलेश यांनीही आधी परदेशी भाज्या उदा. लेट्यूस, केल, पार्सेली यांचे उत्पादन घेतले आहे.

Saffron Farming
Bangladesh Agriculture : बांगलादेशी शेतकऱ्यांचे जगण्यासाठी जीवतोड प्रयत्न

संपूर्ण नियंत्रित पद्धतीने करण्यायोग्य देशी आणि नावीन्यपूर्ण पिकांचा शोध घेताना त्यांना केशर या काश्मीरमध्ये मर्यादित असलेल्या पिकाची माहिती समजली. यानंतर एका ३२० वर्गफुटाच्या कंटेनरमध्ये तयार करून संपूर्ण नियंत्रित आणि एअरोपोनिक पद्धतीने श्री. मोडक यांनी केशर उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला.

आता त्याचे उत्पादन नुकतेच सुरू झाले असून, एका ट्रेमधून सरासरी सुमारे १.९३ ते २ ग्रॅम इतके केशर मिळू लागले आहे. या पिकाचे प्रोटोकॉल अधिक शास्त्रीय पद्धतीने करण्याचे नियोजन ते करत आहेत.

‘‘कंटेनर किंवा बंदिस्त हरितगृहामध्ये संपूर्णपणे वातावरण नियंत्रित करता येत असल्यामुळे तात्त्विकदृष्ट्या कोणतेही पीक घेणे शक्य असते. परंतु आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन खर्च अधिक असल्याने, ज्यातून आर्थिकदृष्ट्या अधिक फायदा मिळेल, अशाच पिकांची निवड करावी लागते. यातून केशरचे उत्पादन घेण्याचे निश्‍चित केले.’’
शैलेश मोडक, केशर उत्पादक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com