Silk Cocoon Market : जालन्यात रेशीम कोष बाजारपेठ व्यवस्थापन प्रणाली (ॲप) विकसित

Jalna Silk Market : जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाने १ एप्रिलपासून रेशीम कोष बाजारपेठ व्यवस्थापन प्रणाली(ॲप) लॉंच केली आहे.
Silk Cocoon Market
Silk Cocoon MarketAgrowon
Published on
Updated on

Silk Cocoon Market : जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाने १ एप्रिलपासून रेशीम कोष बाजारपेठ व्यवस्थापन प्रणाली(ॲप) लॉंच केली आहे. या विकसित प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर बाजारपेठेतील रोजचे रेशीम कोषांचे दर, प्रातिनिधीक रूपात कवच टक्केवारी, एकूण कोषांची गाव, तालुका, जिल्हा निहाय आवक, रेशीम उद्योगाविषयी तांत्रिक माहिती, रेशीम सल्ला, हवामान अंदाज माहिती दररोज पहावयास मिळण्याची सोय होते आहे.

सद्यःस्थितीत जालन्याच्या रेशीम कोष बाजारपेठेत कोषांची खरेदी-विक्री नजर अंदाज व व्यापाऱ्यांच्या अनुभवानुसार खुला दर पुकारण्यात येतो. सदरचा दर शेतकऱ्यास मान्य झाल्यास खरेदी-विक्री प्रक्रिया पूर्ण होत होती.

मराठवाडा रेशीम उद्योगाचा हब मानला जातो. बाजारपेठेसह धागा निर्मितीत पाय रोवणाऱ्या मराठवाड्यातील रेशीम उद्योगाची वाटचाल आता अंडीपुंज निर्मिती व जालना येथे अद्ययावत अशा रेशीम कोष बाजारपेठेच्या कार्यान्वीततेच्या दिशेने सुरू आहे.

जालना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या संकल्पनेतून व जिल्हा रेशीम विकास अधिकारी अजय मोहीते यांचे प्रयत्नाने एका खासगी कंपनीद्‌वारे रेशीम कोष बाजारपेठ व्यवस्थापन प्रणाली (सॉफ्टवेअर ॲण्ड एएमपी मोबाईल ॲप) ची निर्मिती केली आहे.

Silk Cocoon Market
Silk Production : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०० टन रेशीम कोष उत्पादन

जालना जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील आतापर्यंत जवळपास १८१७ शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर सुरू केला आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याने ॲप डाऊनलोड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

विकसित प्रणालीचा शेतकऱ्यांनी व रेशीम कोष बाजारपेठेशी संबंधितांनी प्रत्यक्ष वापर १ एप्रिल २०२३ पासून सुरू केला आहे. प्रत्येक रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्याला आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये जाऊन सिल्क ककून मार्केट जालना( Silk Cocoon Market Jalna) असे टाइप करून ॲप इन्स्टॉल्ड करून घेता येईल.

Silk Cocoon Market
Silk Industry : शेतकऱ्यांच्या समृद्धीत रेशीम उद्योगाचा महत्त्वाचा वाटा

१०३ टन कोष खरेदी

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत १ एप्रिलपासून म्हणजे ॲप कार्यान्वित झाल्यापासून ७ मे पर्यंत १०३ टन कोषाची विक्री झाली. विविध जिल्ह्यातून आलेल्या जवळपास १०७१ शेतकऱ्यांचे हे कोष होते.

दरदिवशी किमान ४ टन कोष जालना बाजार समितीमध्ये येत आहेत. सरासरी ४८ लॉटमधून आलेल्या कोषांची विक्री होते आहे. या कोषांना २०० त ५२५ रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळाल्याची माहिती रेशीम कोष खरेदी विक्रीची रेशीम विभागातर्फे जबाबदारी सांभाळणारे भरत जायभाये यांनी दिली.

रेशीम कोष बाजारपेठेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न आहे. जालना येथील नवनिर्मित रेशीम कोष बाजारपेठेत प्रत्यक्ष कोष खरेदी विक्री सुरू झाल्यानंतर कोष विक्री करिता आलेल्या शेतकऱ्यांना छोट्या पडद्यावर त्यांच्या व इतरांच्या कोषांना मिळालेला दर, कोषांचा दर्जा, खरेदीदार व्यापारी आदी माहिती दिसणार आहे.
- अजय मोहिते, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, जालना
रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना घरबसल्या बाजारपेठेत किती कोष आले, कोणत्या गावचे शेतकरी, कमी अधिक दर, कोषांचा दर्जा, हवामान अंदाज सारं काही मोबाईल अपॅच्या माध्यमातून मिळण्याची सोय झाली आहे. शिवाय रेशीम उद्योगाशी संबंधित बातम्या व इतर माहितीही या ॲपच्या माध्यमातून होते आहे जी आमच्यासाठी फायद्याची आहे.
- भाऊसाहेब निवदे, रेशीम कोष उत्पादक, मच्छींद्र चिंचोली, जि. जालना

असे आहेत विकसित प्रणालीचे(ॲप) फायदे

  • - कोषांना मिळालेला दर, कोषांचा दर्जा, खरेदीदार व्यापारी माहिती दिसणार

  • - कोष विक्रीची पावती लगेच तयार होणार.

  • - खरेदी केलेल्या कोषांची शेतकरी निहाय बॅंक तपशीलासह यादी तयार होणार.

  • - शेतकऱ्यांना कोषांचे पेमेंट लवकर मिळण्याची सुविधा.

  • - प्रत्येक शेतकऱ्याने वर्ष भरात किती कोष विक्री केले, त्याची किती रक्कम त्यांना मिळाली याची माहिती मिळेल.

  • - चांगल्या रेशीम कोषांना प्रति क्विंटल ३० हजार रुपयांपेक्षा कमी दर मिळाल्यास अटी व शर्तीनुसार प्रति क्विंटल अनुदान देण्याची सुविधा.

  • - प्रत्येक खरेदीदार व्यापाऱ्याने रेशीम कोष बाजारपेठेमधून किती कोष खरेदी केले, कोणत्या दराने व त्याची एकूण रक्कम तपशील तयार होणार.

  • - रेशीम कोष बाजारपेठेच्या सुटी बाबत अथवा इतर सूचना शेतकऱ्यांना मोबाईलवर प्राप्त होणार.

  • - रेशीम शेती विषयी वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन व माहिती मोबाईलवर उपलब्ध होणार.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com