Agriculture Technology : सकस चारा पिकांचे उत्पादन तंत्र

Fodder Crop Production : संतुलित व पौष्टिक चारा हा दुग्धोत्पादनाचा आधारस्तंभ आहे. जनावरांच्या आहारात चाऱ्याला सर्वाधिक महत्त्व आहे. दुग्ध व्यवसायामध्ये एकूण खर्चाच्या ७० टक्के खर्च हा पशुआहारावर होत असतो.
Fodder Crop
Fodder CropAgrowon
Published on
Updated on

डॉ. गोविंद शिऊरकर, डॉ. बाळासाहेब सोनवलकर, मेघना बिचुकले

Nutritious Fodder Crop : संतुलित व पौष्टिक चारा हा दुग्धोत्पादनाचा आधारस्तंभ आहे. जनावरांच्या आहारात चाऱ्याला सर्वाधिक महत्त्व आहे. दुग्ध व्यवसायामध्ये एकूण खर्चाच्या ७० टक्के खर्च हा पशुआहारावर होत असतो. जनावरांना चारा हा ओल्या आणि सुक्या स्वरूपात द्यावा लागतो. हिरव्या चाऱ्याचे नियोजन हंगामानुसार करावे लागते. हिरव्या चाऱ्यामध्ये पोषणमुल्ये सहज विद्राव्य स्वरूपात उपलब्ध होतात. त्यामुळे हिरवा चारा पचनास हलका असतो.

ज्वारी

महत्त्वाचे अन्नधान्य वर्गीय पीक.

चाऱ्यासाठी उत्तम पीक आहे.

रब्बी हंगामात ऑक्टोबरमध्ये लागवड करता येते.

सुधारित वाण : मालदांडी, फुले अमृता, पुसा चारी, एम.पी.चारी

बियाणे प्रमाण (हेक्टरी) : ४० किलो

पेरणी अंतर : ३० सेंमी

कापणी : ६५ ते ७० दिवस

उत्पादन (हेक्टरी) : ५०० ते ५५० क्विंटल

वैशिष्ट्ये

हिरवी वैरण जास्त झाल्यास वाळवून साठविता येते.

चाऱ्यासाठी पीक ५० टक्के फुलोऱ्यात आल्यावर कापणी सुरू करावी.

चाऱ्यासाठी ज्वारी ४० ते ५० दिवसांच्या आत कापू नये. कारण या अवस्थेमध्ये पिकात हायड्रोसायनिक आम्ल नावाचे विषारी द्रव्य असते. त्यामुळे विषबाधा होऊन जनावरे दगावण्याची शक्यता असते.

पोषणमूल्ये : प्रथिने ७.५ ते ८.५ टक्के, पचनियता ५५ ते ६० टक्के.

Fodder Crop
Fodder Crop: जनावरांसाठी चारा म्हणून मका पिकाची लागवड

मका

रब्बी हंगामात ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान लागवड करता येते.

सुधारित वाण : मांजरी, कंपोझिट, गंगा सफेद

बियाणे प्रमाण (हेक्टरी ) : ७५ किलो

पेरणी अंतर : ३० सेंमी

कापणी : ५० टक्के तुरे आल्यानंतर

उत्पादन (हेक्टरी) : ४०० ते ६०० क्विंटल

वैशिष्ट्ये

उंच वाढणारे हंगामी पीक असून तृणधान्य वर्गात मोडते.

चाऱ्यासाठी मका पीक वर्षभर घेता येते.

दुभत्या जनावरांना हिरवा चारा खाऊ घातल्यास दुधाचे प्रमाण वाढते.

पीक तुरे आल्यापासून ते दाण्याची दुधाळ अवस्था येईपर्यंत खाऊ घालावे.

लसूणघास

ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान लागवड करता येते.

सुधारित वाण : आर.एल ८८, सिरसा ९, आनंद २

बियाणे प्रमाण (हेक्टरी ) : २५ किलो

पेरणी अंतर : ३० सेंमी

कापणी : पहिली ५५ ते ६० दिवस, दुसरी २५ ते ३० दिवस

उत्पादन (हेक्टरी) : १००० ते १२०० क्विंटल

वैशिष्ट्ये

द्विदल वर्गातील वर्षभर भरपूर पौष्टिक चारा देणारे पीक म्हणून ओळखले जाते.

चारा अतिशय सकस आणि लुसलुशीत असतो.

वाढीसाठी मध्यम थंड हवामानाची गरज असते.

उष्ण व कोरड्या हवामानात सुद्धा उत्तम वाढू शकते.

जास्त झालेला चारा वाळवून किंवा मूरघास करून साठविता येतो.

Fodder Crop
Rabbi Fodder Crops : रब्बी हंगामातील चारा पिकांचे नियोजन

ओट

ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान लागवड करता येते.

सुधारित वाण : फुले हरिता, के.जे.एच.ओ ८२२

बियाणे प्रमाण (हेक्टरी ) : १०० किलो

पेरणी अंतर : ३० सेंमी

कापणी : पहिली ५५ ते ६० दिवस, दुसरी ३० ते ४० दिवस

उत्पादन (हेक्टरी) : ५०० ते ६०० क्विंटल

वैशिष्ट्ये

रब्बी हंगामात हिरव्या व सकस चाऱ्याचे भरपूर उत्पादन देणारे पीक आहे.

हा चारा जनावरे आवडीने खातात.

हिरवा चारा, वाळलेली वैरण आणि मुरघास या तिन्ही प्रकारे उपयोग होतो.

चाऱ्यात पानांचे प्रमाण अधिक असते.

जायंट बाजरी

उन्हाळी हंगामात फेब्रुवारी ते मार्च महिन्यात लागवड करता येते.

सुधारित वाण : जायंट बाजरा, राजको बाजरा

बियाणे प्रमाण (हेक्टरी ) : १० किलो

पेरणी अंतर : ३० सेंमी

कापणी : ५५ ते ६० दिवस

उत्पादन (हेक्टरी) : ४५० ते ५०० क्विंटल

वैशिष्ट्ये

जायंट बाजरी ही कोणत्याही अवस्थेत जनावरांना खाऊ घालता येते. कारण या चाऱ्यात कोणतेही विषारी द्रव्य नसते.

पालेदार, रसाळ, मऊ पानाची असते.

जास्त चारा उत्पादन मिळते.

साधारण २ ते ३ कापण्या देणारी.

डॉ. गोविंद शिऊरकर, ९३०९०८१९४९

(लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय, कडेगाव, जि. सांगली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com