Processing equipment: कृषी प्रक्रियेसाठी वापरा ही यंत्रे

अलीकडे प्रक्रिया उद्योगाकडे तरुणांचा कल वाढत आहे. शेतमालावर प्रक्रिया करुन चांगला फायदा मिळवता येतो.
Post Harvesting Equipment
Post Harvesting EquipmentAgrowon
Published on
Updated on

अलीकडे प्रक्रिया उद्योगाकडे तरुणांचा कल वाढत आहे. शेतमालावर प्रक्रिया करुन चांगला फायदा मिळवता येतो. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाने शेतमाल प्रक्रिया उद्योगासाठी बहुउपयोगी यंत्रे विकसित केली आहेत. या यंत्राच्या वापरामुळे श्रम कमी होऊन वेळेत बचत करणे शक्य होणार आहे. या व्यतिरिक्त शेतकरी, बेरोजगार तरुणांना व्यवसाय सुरू करून उद्योजक होण्याची संधीही मिळणार आहे.

जांभूळ गर काढण्यासाठीचे यंत्र

जांभळाच्या बिया व गर वेगवेगळे करण्यासाठी या यंत्राची मदत होते. क्षमता तासाला ७५ ते ८५ किलो गर काढण्याची आहे. अर्धा एचपी क्षमतेच्या विद्युत मोटरवर ते चालते. वजन कमी असल्याने यंत्राची ने-आणसुद्धा करता येते. किंमत ८५ हजारांपर्यंत आहे.

सीताफळ गर काढणारे यंत्र

राज्यात सीताफळाचे क्षेत्र वाढत आहे. या फळ विक्रीसाठी कमी कालावधी मिळतो. अशा वेळी त्याचा गर काढून वर्षभर साठवून ठेवला तर निश्‍चितच फायदा होऊ शकतो. हे पाहता सीताफळ गर व बिया निष्कासन यंत्र बनविले आहे. त्याद्वारे तासाला ७० ते ८० किलो गर काढता येतो. हे यंत्र ०.५ अश्‍वशक्तीच्या सिंगल फेज विद्युत मोटरवर चालते. अकुशल मजूरही याचा वापर करू शकतो. ९२ ते ९६ टक्के गर काढणे शक्य होते. यंत्राद्वारे उपलब्ध गरात ७५ टक्के पाकळ्या राहतात. किंमत जवळपास ८० हजार रुपये आहे.

लिंबाचे काप बनविणारे यंत्र

लिंबापासून लोणचे व अन्य प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात. त्यासाठी लिंबाचे काप करावे लागतात. हे काम मानवी पद्धतीने केले जात असल्याने त्यासाठी बराच वेळ लागतो. ही त्रुटी पाहता लिंबाचे काप तयार करणारे यंत्र बनवले आहे. त्याद्वारे तासाला १५० लिंबावर काम करता येते. कार्यक्षमता ९० ते ९५ टक्के आहे. एका ठिकाणाहून यंत्र दुसरीकडे नेता येऊ शकते. दुरुस्ती, हाताळणी सोपी आहे. व्यावसायिकदृष्ट्या हे यंत्र उपयोगी आहे. साधारणतः ३५ ते ४० हजारांपर्यंत उपलब्ध होऊ शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com