खोडवा पिकामध्ये संवर्धित शेतीमध्ये पाचट आच्छादन (Trash Mulching) केले जाते. परंतू अजूनही शेतकरी पाचट जाळतात. यामुळे मातीचे जीवशास्त्र विस्कळीत होते, नैसर्गिक भू-चक्र बिघडते, सुपीकता कमी होते आणि पर्यावरणीय प्रदूषणाला हातभार लागतो. ऊसतोडणीनंतर () पाचट आच्छादनामुळे काही वेळा आंतरमशागतीय क्रियांमध्ये अडथळा येतो. नवीन पिकाच्या तुलनेत खोडवा उसाचे उत्पादन २५ ते ३० टक्के कमी होते. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेने बहू-कार्यान्वित खोडवा ड्रील यंत्र विकसित केले आहे. बहू-कार्यान्वित खोडवा ड्रील यंत्र मातीत खते देणे, बियाणे पेरणीसाठी उपयुक्त आहे. याचबरोबरीने मुळांचा जारवा तोडणे, पाचटावर माती टाकणे आणि ऊस बुडक्यांची छाटणी करण्यासही फायदेशीर ठरणारे आहे.
बहू-कार्यान्वित खोडवा ड्रील यंत्र (Multi-functional khodwa drill machine) पीटीओ टरॅक्टरचलित (३५ ते ६५ अश्वशक्ती)आहे. यंत्र मातीत खते (१५ ते २० सेंमी खोली) आणि बियाणे (५ ते ७ सेंमी) सोडण्याव्यतिरिक्त इतर विविध कामे करते उदा. मुळांची छाटणी म्हणजेच जारवा तोडणे, पाचटावर माती टाकणे आणि ऊस बुडक्यांची छाटणी करणे.
यंत्राद्वारे होणारी कामे
बहू-कार्यान्वित खोडवा ड्रील यंत्र पाचटकुट्टी करून राखलेल्या खोडवा उसात एकाच वेळी पाच प्रमुख कामे करण्यासाठी योग्य आहेत. उसाची हाताने कापणी केल्यानंतर शेतात उरलेले असमान बुडखे, पृष्ठभागाजवळ एकसमान उंचीवर खूप वेगाने कापले जातात.
उभे ऑफ-बेरिंग डिस्क्स फावडे वाफ्याला बाहेरील बाजूंनी अर्धवट कापतात. कापलेल्या मातीला कुट्टी केलेल्या पाचटावर पसरवतात, जेणेकरून त्याचे विघटन वेगवान होईल.
ताज्या मुळांच्या वाढीस चालना देण्यासाठी खोडवा उसाच्या बाजूच्या जुन्या मुळांची छाटणी केली जाते. नव्याने विकसित झालेली मुळे उसाच्या सुरुवातीच्या वाढीस चालना देतात.
यामुळेपाणी आणि पोषक तत्त्वांच्या शोषणास प्रोत्साहन मिळते. पृष्ठभागावर पाचट राखून ठेवताना खोडवा उसामध्ये खते देण्यासाठी वापर शक्य आहे. पृष्ठभागावर पाचट राखून खोडवा उसामध्ये आंतरपीक पेरणीसाठी बियाणे-ड्रील जोडणीचा वापर केला जातो.
खत बॉक्सच्या माध्यमातून एकाच वेळी देता येतात. याचा वापर करण्यापूर्वी ड्रील यंत्र बियाण्यांसह खत वापरण्यासाठी कॅलिब्रेट केले जाते.
जमीन परिस्थितीनुसार यंत्राची चाचणी करण्यात येते. यंत्राची कार्यक्षमता तपासण्यासाठी संस्था आणि शेतकऱ्यांच्या शेतातील दोन्ही परिस्थितीमध्ये खोडवा उसाची वाढ, उत्पादन आणि उत्पादकता याचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये पाचट जाळलेले शेत किंवा पाचटाचे तुकडे करणे आणि मातीच्या पृष्ठभागावर आच्छादन याची तुलना केली गेली.
यंत्राचे फायदे काय आहेत?
३.२ किमी प्रति तास या गतीने ३५ एचपी ट्रॅक्टर वापरून सर्वोच्च क्षेत्र क्षमता सह खोडवा व्यवस्थापन आणि इतर कामे वेळेवर पूर्ण होतात. खोडवा उसाचे उत्पन्न १० ते ३८ टक्क्यांनी वाढते. निरोगी तसेच सक्षम ऊस प्रमाण आणि कमीत कमी मशागत.
खोडवा उसासाठी ६ ते २१ टक्के पाण्याची आणि २० ते २५ टक्के खतांची बचत. खत योग्य प्रकारे मातीत मिसळले जाते. याचबरोबरीने हरभरा, मका यांसारख्या आंतरपिकांचा पेरणी पाचट पृष्ठभागावर असूनही करता येते.
नायट्रोजन वापर कार्यक्षमतेत १३ टक्क्यांपर्यंत लक्षणीय सुधारणा आणि अमोनिया अस्थिरीकरणाचे नुकसान कमी करते. निव्वळ नफ्यात वाढ. खर्चाचे प्रमाण १२.६ टक्क्यांपर्यंत कमी.
सुधारित मुळांच्या वाढीमुळे अल्पकालीन पाण्याच्या ताणाचा प्रतिकूल परिणाम कमी होण्यास मदत होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.