

महाराष्ट्रामध्ये फळबाग लागवड वाढत आहे. फळबागेच्या व्यवस्थापनासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पामध्ये तसेच खासगी उत्पादकांनी तयार केलेली आधुनिक अवजारे उपयुक्त ठरू शकतात. ही अवजारे ट्रॅक्टरचलित व स्वयंचलित अशी आहेत.
ट्रॅक्टरचलित फुले ॲटोमॅटिक पल्टी नांगर
४५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते
ट्रॅक्टरच्या पोजिशन कंट्रोल लिव्हरद्वारे आपोआप पलटी करता येतो. त्यासाठी मेकॅनिकल लिव्हर किंवा हायड्रोलिक सिलिंडरची आवश्यकता नाही.
या नांगराची प्रक्षेत्रीय कार्यक्षमता ८०.४५ टक्के इतकी आहे
हायड्रोलिक नांगरापेक्षा देखभाल व दुरुस्ती खर्च कमी.
या नांगराची मूळ किंमत हायड्रोलिक नांगराच्या तुलनेत सुमारे २० टक्क्याने कमी आहे.
हलक्या मध्यम व भारी जमिनीची नांगरणी योग्य त्या खोलीपर्यंत करण्याकरिता हा नांगर उपयुक्त आहे.
ट्रॅक्टरचलित पोस्ट होल डिगर
४५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते.
फळ पिकांच्या लागवडीसाठी खड्डे खोदण्यासाठी उपयुक्त.
एका तासात सुमारे २० ते २५ खड्डे खोदले जातात.
स्वयंचलित रोटरी खुरपणी यंत्र
३ ते ६ ५ अश्वशक्ती डिझेल इंजिनवर चालते.
एका दिवसात २ ०० ते २ ५० हेक्टर क्षेत्रावर तण काढणी करता येते
पारंपारिक पद्धतीपेक्षा खर्चात ६० ते ७० टक्के वेळेची बचत.
बागेतील झाडांमधील तण काढण्यासाठी उपयुक्त.
पारंपारिक पद्धतीपेक्षा वेळेत ७० ते ८० टक्के बचत.
ट्रॅक्टरचलित रोटरी यंत्र
१८ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.
बागेतील झाडांमधील तण काढण्यासाठी उपयुक्त.
ट्रॅक्टरचलित फुले हायड्रो - मेकॅनिक नियंत्रित फळबाग ऑफसेट व्यवस्थापन यंत्र
३५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.
बागांमध्ये एकाच वेळी जुनी मुळे कापण्यासाठी व बेड तोडण्यासाठी उपयुक्त.
पारंपारिक पद्धतीपेक्षा खर्चात ४८ टक्के बचत.
क्षमता ०.१२७ हेक्टर प्रति तास.
ट्रॅक्टरचलित फुले हायड्रो - मेकॅनिक नियंत्रित तण काढणी यंत्र
२५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.
फळ बागेतील झाडांच्या दोन ओळी व दोन झाडांच्या मधील जागेतील तण काढण्यासाठी उपयुक्त.
याचे रोटरी युनिट दोन झाडांच्या मध्ये व बाहेर हायड्रो-मेकॅनिकल यंत्रणेद्वारे सहजपणे कार्य करते.
प्रक्षेत्रीय कार्य क्षमता एका दिवसात सव्वा हेक्टर.
ट्रॅक्टरचलित सेन्सरयुक्त फवारणी यंत्र
सेन्सरमुळे फळबागेतील झाडानुसार आणि त्या झाडाच्या कॅनोपीवर द्रव रसायनाची फवारणी करण्यात येते.
या यंत्रात अल्ट्रासोनिक सेन्सर, मायक्रो कंट्रोलर बोर्ड, सोलेनॉईड वनवे वॉल्व्ह, स्प्रे पंप, प्रेशर गेज, नोझल आणि १२ व्होल्ट बॅटरी इ. समाविष्ट आहेत.
सेन्सरसह शंकूच्या नोझलसाठी किमान २०० लिटर प्रति हेक्टर एवढी क्षमता आहे.
पारंपारिक पद्धतीपेक्षा ५० ते ६० टक्के रसायनाची बचत.
ट्रॅक्टरचलित टायकून स्प्रेअर
३५ ते ५० अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.
ट्रॅक्टरच्या पीटीओ द्वारे चालविता येते.
टाकी क्षमता - ४०० लिटर.
फवारणी क्षमता- ३६ लिटर /मिनीट (९५० फेरे प्रतिमिनिट आणि दाब जास्तीत जास्त ४०० पीएसआय असताना.)
मोठ्या झाडाच्या फळबागेत फवारणीसाठी उपयुक्त आहे. उदा. आंबा, आवळा, जांभुळ इ.
ट्रॅक्टरचलित इलेक्टोस्टॅटीक स्प्रेअर (इएसएस)
२४ ते ३० अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.
पीटीओच्या साहाय्याने वापरता येते.
टाकी क्षमता - २१२ ते ५६८ लिटर.
फवारणी क्षमता- २.८८ ते ५.०३ लिटर /मिनीट.
प्रभावी अल्ट्रा लो व्हॉल्यूम स्प्रेअर असून, ४० मायक्रॉन थेंबाचा आकार मिळू शकतो.
द्राक्षे बागेसाठी अतिशय उपयुक्त आहे.
स्वयंचलित फवारणी यंत्र (क्राउलर टाइप)
हे फवारणी यंत्र फळबागेत (प्रामुख्याने द्राक्ष) वापरण्यास योग्य. अगदी पावसाळ्यात म्हणजेच बागेत पाणी साचलेले असताना फवारणी करणे शक्य होते.
हे यंत्र स्वयंचलित असून, १८ अश्वशक्तीचे डिझेल इंजिन आहे.
या यंत्रामध्ये ईएसएस (इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअर) संरचना दिलेली आहे.
टाकीची क्षमता ४०० लिटर आहे.
फवारणी क्षमता १५ फूटपर्यत आहे.
वळण त्रिज्या कमी असल्याने सहजगतीने दोन ओळीमध्ये प्रभावीरित्या फवारणी करता येते.
ट्रॅक्टरचलित फुले कुट्टी यंत्र
३५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.
फळबागेतील छाटणीनंतर पडणाऱ्या अवशेषांची कुट्टी करून बेडवर दोन्ही बाजूस समांतर टाकण्याकरिता उपयुक्त. उदा. द्राक्षे
अवशेषांची कुट्टी करण्याकरिता ट्रॅक्टरच्या पीटीओ शक्तीचा वापर केला आहे. कुट्टी केलेले अवशेष बेडवर दोन्ही बाजूस समांतर टाकण्याकरिता हायड्रोलिक शक्तीचा वापर केलेला आहे.
प्रक्षेत्रीय क्षमता ७८ टक्के.
एका तासात ०.४७ हेक्टर क्षेत्रावर अवशेषांची कुट्टी करून टाकते.
पारंपरिक पद्धतीपेक्षा खर्चामध्ये ७२ टक्के बचत.
ट्रॅक्टरचलित ॲग्रिकल्चरल वेस्ट श्रेडर
२१ ते ४५ अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.
वाया जाणारे पीक अवशेष उदा. द्राक्षे, डाळिंब, पेरू, चिकू यांच्या छाटणीनंतर पडणाऱ्या काड्या व खोड यांचा बारीक चुरा करता येतो. हे पीक अवशेष बागेत आच्छादन करता येतात. ते कुजल्याने मातीतील सेंद्रिय कर्ब वाढतो. या अवशेषातील उपयुक्त अन्नद्रव्ये पुढील पिकासाठी मातीमध्ये उपलब्ध होतात.
क्षमता- १ टन प्रति तास.
ट्रॅक्टरचलित केळीचे खुंट काढण्याचे यंत्र
३५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.
केळीचे खुंट काढण्यासाठी उपयुक्त.
क्षमता ० ११ हेक्टर प्रति तास.
वेळेत ३० ते ४० टक्के आणि खर्चात ५० ते ६० टक्के बचत.
ट्रॅक्टरचलित केळीचे खुंट बारीक करण्याचे यंत्र
३५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.
केळीच्या खुंटाचे बारीक तुकडे करण्यासाठी या यंत्राचा उपयोग होतो.
या बारीक केलेल्या कुट्टीपासून गांडूळखत निर्मिती करता येते.
क्षमता- १२० ते १३० केळीचे खुंट प्रति दिवस.
डॉ. तुळशीदास बास्टेवाड
(प्राध्यापक व प्रमुख संशोधक, अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.