एनटीपीसीच्या मदतीने सौर ऊर्जा पार्क उभारणार

एनटीपीसीच्या सहकार्याने राज्यात २५०० मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महानिर्मिती कंपनीस एनटीपीसी लिमिटेडसोबत मिळून एक संयुक्त कंपनी स्थापन करण्याची संमती देण्यात आली आहे.
Maharashtra government and NTPC to jointly set up solar energy park
Maharashtra government and NTPC to jointly set up solar energy parkAgrowon

एनटीपीसीच्या सहकार्याने राज्यात २५०० मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महानिर्मिती कंपनीस एनटीपीसी लिमिटेडसोबत मिळून एक संयुक्त कंपनी स्थापन करण्याची संमती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दिनांक ८ एप्रिल) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Maharashtra government and NTPC to jointly set up solar energy park
महाराष्ट्रातले शेतकरी का जाताहेत तेलंगणात ?

राज्यात २५०० मेगावॅट क्षमतेपर्यंतचे अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क विकसित करण्याकरीता नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लिमिटेड (एनटीपीसी) आणि महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महानिर्मिती) यांच्यात निम्मे निम्मे भांडवल गुंतवल्या जाणार आहे.

ही संयुक्त कंपनी राज्यात २५०० मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क विकसित करेल. राज्य शासनाचा ऊर्जा विभाग यासाठी मध्यस्थ नियामक यंत्रणा म्हणून (State Nodal Agency) काम पाहणार आहे.

या समितीवर राज्य शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा धोरणाशी सुसंगत अशा बाबींचे पालन करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. सौर ऊर्जा पार्कमधील प्रकल्पधारकाकडून एक रकमी शुल्क व वार्षिक संचलन व देखभाल शुल्क केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठरवण्यात आले आहे.

अपारंपरिक ऊर्जासाठी १७३६० मेगावॅट क्षमतेच्या निर्मितीचे प्रकल्प २१ मार्च २०२५ पर्यंत विकसित करण्यात येणार असून यापैकी १२९३० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प सुरु करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यात सध्या ९३०५ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित असून २१२३ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com