Agriculture Technology : कापसाच्या पऱ्हाट्या बारीक करणारी यंत्रे

Cotton Harvesting Machine : कापसाची काढणी झाल्यानंतर उरलेल्या पऱ्हाट्या जाळून टाकल्या जातात. परंतु या पऱ्हाट्या बारीक करून जमिनीत मिसळल्यास सुपीकता वाढविण्यासाठी मदत होते.
Cotton Harvesting Machine
Cotton Harvesting Machine Agrowon
Published on
Updated on

डॉ. प्रियांका खोले

Cotton Farming : कापसाची काढणी झाल्यानंतर उरलेल्या पऱ्हाट्या जाळून टाकल्या जातात. परंतु या पऱ्हाट्या बारीक करून जमिनीत मिसळल्यास सुपीकता वाढविण्यासाठी मदत होते. पाणी धरण्याची क्षमता वाढते आणि पिकांची वाढ चांगली होते. कापसाच्या पऱ्हाट्या बारीक करणारी यंत्रे उपलब्ध झाली आहेत.

श्रेडर यंत्र

हे यंत्र पऱ्हाट्यांचे लहान तुकडे करण्यासाठी उपयुक्त आहे. हे यंत्र डिझेल किंवा विजेवर चालते.

रोटाव्हेटर

ट्रॅक्टरला जोडून वापरण्यात येणारे हे यंत्र पऱ्हाट्यांना बारीक करून जमिनीत मिसळते.

हॅमर मिल

एक स्थिर यंत्र असून, यामध्ये हातोड्याच्या साहाय्याने पऱ्हाट्या बारीक केल्या जातात.

Cotton Harvesting Machine
Cotton Farming : ‘केव्हीके’च्या पुढाकाराने दोनद येथे कापूस शेतीदिन

चिपर

हे यंत्र पऱ्हाट्यांचे छोटे तुकडे करते. हे तुकडे लवकर जमिनीत कुजतात.

मोबाइल श्रेडर

मोबाइल श्रेडर हे यंत्र ट्रॅक्टरला जोडून शेतात फिरवता येते. या यंत्रामुळे पऱ्हाट्या जलद गतीने बारीक होतात आणि जमिनीत हे बारीक तुकडे मिसळणे सोपे जाते.

पऱ्हाट्या बारीक करण्याचे काम सहज आणि जलदगतीने पूर्ण करता येते.

तुकडे तयार करण्याची क्षमता :

२ टन/तास

इंधन वापर: ४.५ लिटर/तास

सरासरी तुकड्यांचा आकार :

३५ मिमी

Cotton Harvesting Machine
Cotton Cultivation : सघन कापूस लागवडीमुळे उत्पादनात लक्षणीय वाढ

फायदे

पऱ्हाट्या जाळून टाकण्यापेक्षा बारीक तुकडे करून जमिनीत मिसळणे पर्यावरणासाठी फायदेशीर आहे.

पऱ्हाट्यातील पोषक तत्त्वे जमिनीला मिसळून सुपीकता वाढते. सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणात वाढ दिसून आली.

सेंद्रिय घटकांची उपलब्धता वाढते. रासायनिक खतांचा वापर कमी होतो.

यंत्र वापरण्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाचतो.

मोबाइल श्रेडरचा प्रयोग

सगरोळी, जि. नांदेड येथील कृषी विज्ञान केंद्राने कापसाच्या पऱ्हाट्यांचा योग्य वापर करण्यासाठी मोबाइल श्रेडरचा यशस्वी प्रयोग केला आहे.

या प्रयोगामध्ये जमिनीची सुपीकता आणि पिकाचे उत्पादनवाढीस चालना मिळाली.

काट कळंबा (ता.कंधार, जि.नांदेड) येथील प्रयोगशील शेतकरी कपिल चावरे यांच्या शेतामध्ये ट्रॅक्टरचलित मोबाइल सेंटरच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राने कापसाच्या पऱ्हाट्यांची भुकटी करून ती शेतामध्ये टाकण्यात आली.

त्यानंतर या जमिनीची योग्य पद्धतीने मशागत करण्यात आली.त्यानंतर सोयाबीन लागवड करण्यात आली. तीन महिन्यानंतर त्या शेतातील मातीचे नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये असे दिसून आले, की जमिनीमधील अन्नद्रव्यांमध्ये वाढ झाली. तसेच सोयाबीनचे पीक चांगल्या प्रकारे आले होते.

डॉ. प्रियांका खोले, ७७९८१६५०४९

(विषयज्ञ (कृषी अभियांत्रिकी) कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी,जि.नांदेड)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com