Khava Machine : या यंत्रांनी बनवा कमी वेळेत खवा

खवा बनविण्यासाठी अधुनिक यंत्रे विकसित करण्यात आली आहेत. ही यंत्रे छोट्या आणि मोठ्या खवा उत्पादकांसाठी नक्कीच फायदेशीर आहेत. या यंत्रामुळे चांगल्या प्रतीचा खवा कमी वेळात करणे शक्य होते.
 Khava Machine
Khava MachineAgrowon
Published on
Updated on

खवा (Khava) बनविण्यासाठी प्रमुख्याने म्हशीच्या दुधाचा वापर केला जातो. पारंपारिक पद्धतीने खवा बनविण्याची पद्धत ही वेळखाऊ आहे. याशिवाय खवा बनवताना चांगला आणि एकसारखा खवा बनत नाही. त्यामुळे खव्याची प्रत खालावते. खवा बनवता असताना तो कढईला चिकटतो किंवा करपतो. त्यामुळे खव्याला खरपूस वास येण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी खवा बनविण्यासाठी अधुनिक यंत्रे विकसित करण्यात आली आहेत. ही यंत्रे छोट्या आणि मोठ्या खवा उत्पादकांसाठी नक्कीच फायदेशीर आहेत. या यंत्रामुळे चांगल्या प्रतीचा खवा कमी वेळात करणे शक्य होते.

 Khava Machine
Anand Karve: कमी खर्चात बनवा पाण्याची टाकी

स्टेनलेस स्टील डबल जॅकेटेड यंत्र

या पद्धतीत खवा बनविण्यासाठी गरम वाफेचा आणि स्टेनलेस स्टील डबल जॅकेटेड उपकरणाचा वापर केला जातो. या पद्धतीने खवा बनविल्यास त्याला धुराचा किंवा जळका वास येत नाही. खवा एकजीव, पांढरा शुभ्र बनतो. पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीमधील फरक हाच आहे की, आधुनिक पद्धतीत उष्णतेसाठी वाफेचा वापर केला जातो. कमी प्रमाणात खव्याची निर्मिती करत असलेल्या उद्योजकांना ही पद्धत परवडणारी नाही.

खवा पॅन 

छोट्या उद्योजकांकरिता संशोधकांनी खवा पॅन बनवला आहे. हा खवा पॅन हा चुला/भट्टी वर लाकडाच्या सहाय्याने गरम करावा लागतो. त्यानंतर पॅनमधील पाणी गरम होऊन त्याची वाफ बनते. दुसऱ्या बाजूस असलेल्या दुधाला सतत उकळण्याचे कार्य करते. त्यापासून खवा बनतो. या खवा पॅनच्या वापराने सुमारे ८ मिनिटात २.५ लिटर दुधापासून ०.६ किलो उच्च प्रतिचा खवा मिळतो.   

 Khava Machine
Khoya Production : खवा, पेढे निर्मितीत कमावले नाव

कंटीन्युअस खवा मेकींग मशिन  

या यंत्रामध्ये प्रिहीटींग सिलेंडर आणि दोन कॅस्केडिंग पॅन बसवलेले असतात. सर्व प्रथम दूध हे प्रिहीटींग विभागात येऊन गरम केले जाते. साधारणतः १० ते १२ मिनिटात ३०-३५ टक्के एकूण दुधातील सॉलिड घटक एकजीव होतात. हे एकजीव झालेले घनघटक पहिल्या कॅस्केंडिंग पॅनमध्ये जाते. तिथे ७ ते ८ मिनिटात पुन्हा एकदा ५० - ५५ टक्क्यांपर्यंत एकजीव होतात. हे घनघटक परत दुसऱ्या कॅस्केडींग पॅनमध्ये जाऊन खव्याची अपेक्षित ६५-७० टक्के घनघटक मिळतात.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com