Container House : कासारखेडच्या शेतकऱ्याचे ‘हायटेक मचाण’

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. ते टाळण्यासाठी शेतकऱ्याला जिवाची जोखीम घेत शेतात मुक्काम करावा लागतो. या जागलीच्या काळातील जोखीम करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील कासारखेडा (ता. आर्वी) येथील योगेश माणिकराव लिचडे यांनी आधुनिक मचाण तयार केले आहे.
Container House
Container HouseAgrowon
Published on
Updated on

योगेश लिचडे यांचे गावस्तरावर अवजार निर्मिती (Agriculture mechanization manufacturing) आणि दुरुस्तीचे छोटे वर्कशॉप आहे. सतत नावीन्याचा ध्यास घेतलेले योगेश कमी खर्चाची शेतीउपयोगी अवजारे तयार करत असतात. त्यासाठी अनेक वेळा सामाजिक माध्यमांच्या साह्याने परदेशातील यंत्रे, अवजारे यांचे व्हिडिओ पाहत असतात.

एकदा त्यांच्या पाहण्यात इस्राईलमधील ‘कंटेनर हाउस’ आले. त्यात एका कंटेनरमध्ये किचनसह सर्व सुविधा असलेले छोटे शेतघर तयार केलेले पाहिले. मग त्यांनी कंटेनर हाऊसचे अनेक प्रकार इंटरनेटवर पाहिले.

भारतीय शेतकरी पिकाच्या संरक्षणासाठी थोड्याशा उंचावर बांधलेल्या मचाणावर राहतो. (या रात्रीच्या निवासाला विदर्भामध्ये ‘जागली’ असे म्हणतात.) योगेश यांना कंटेनर हाउस आणि मचाण यांच्या एकत्रीकरणाची कल्पना सुचली.

पावसाळ्यात वीज पडल्यामुळे योग्य आसऱ्याविना थांबलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची बातमीही त्यांच्या वाचनात आली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्‍यात झाडावरील तात्पुरत्या मचाणावरून एका शेतकऱ्याला बिबट्याने पळविल्याचीही घटना घडली होती.

त्यामुळे शेतात जागलीसाठी राहणाऱ्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे जिवाचा धोका सतत राहतो. त्यापासून बचावाच्या उद्देशाने त्यांनी आधुनिक मचाण तयार करण्याचा ध्यास घेतला.

Container House
Agriculture Implements : दुचाकीचलित शेती अवजारे

भारतीय शेतकऱ्यांचा विचार...

इस्राईलमधील ‘कंटेनर हाउस’च्या निर्मितीचा खर्चच मुळी चार लाखाच्या घरात जातो. त्यानंतर त्यातील सोयीसुविधा आणि नफा धरल्यानंतर शेतकऱ्यांना दहा लाख रुपयांपर्यंत ते उपलब्ध होतात.

भारतातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना ते परवडणारे नव्हते. त्यांच्यासाठी मचाणाची निर्मिती करण्यासाठी पहिल्यांदा हलक्‍या प्रतीच्या साहित्य (ॲंगल, लोखंडी शीट) वापरून मचाण तयार केले. मात्र ते वेगवान वाऱ्यामध्ये टिकू शकणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले.

मग थोडा खर्च वाढला तरी चालेल, पण सुरक्षितता महत्त्वाची हा विचार करून जानेवारी २०२२ मध्ये चांगल्या प्रतीच्या साहित्यातून आधुनिक मचाण तयार केले.

सहा फूट उंची व ६० किलो वजनाच्या चार लोखंडी खांबावर मचाण तयार केले आहे. त्यावर पाच बाय सात फूट आकाराची खोली तयार केली. या खोलीमध्ये हवा खेळती राहण्यासाठी दोन बाजून दोन स्लायडिंग खिडक्या केल्या आहेत. त्या काचेच्या असल्याने त्यातून शेतावर दूरपर्यंत लक्ष ठेवता येते.

या खोलीला २५ किलो वजनाचा दरवाजा केला आहे. तो हायड्रोलिक पद्धतीने उघडण्यासाठी किंवा बंद होण्यासाठी दोन हायड्रोलिक सिलिंडर बसवले आहेत. या सहा माणसे बसू शकतो किंवा दोन व्यक्ती आडव्या झोपू शकतात.

निवारा कक्षाच्या खालील बाजूला फोमशीट वापरले आहे. व्यक्‍तीचे श्रम दूर व्हावेत, व आरामदायी राहता येईल, अशा अनेक सोयीसुविधा केल्या आहेत.

Container House
Farm Equipment: पारंपरिक ते अद्ययावत शेती अवजारे

वीज अपघात टाळण्यासाठी खास यंत्रणा

-लोखंड व एनऐट शीटने मचाण बनवले आहे. उन्हाळ्यात ते गरम होऊ नये, यासाठी कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या हिटलॉनचा वापर येथे केला आहे. यामुळे निवारा कक्षातील तापमान नियंत्रित राहते.

-पावसाळ्यात शेतशिवारात वीज पडून अपघाताचे प्रकार घडतात. ते रोखण्यासाठी खास वीजरोधक यंत्रणा मचाणावर बसवली आहे. कॉपर ॲंटेनापासून अर्थिंग काढून ती जमिनीत गाडली आहे. यामुळे २० ते २५ फूट परिसरात वीज पडण्यापासून बचाव शक्‍य होत असल्याचे योगेश यांनी सांगितले.

सौर ऊर्जेवर चालतात संपूर्ण यंत्रणा

-शेती निवारा कक्षात प्रकाशासाठी १२ वॉट क्षमतेचे चार एलईडी दिवे बसवले आहेत.

-मोबाईल चार्जिंगसह अन्य कामांसाठी दोन प्लग देण्यात आले आहेत.

- उन्हाळ्यात तापमान नियंत्रण व थंड हवेसाठी दोन्ही बाजूंस दोन फॅन लावले आहेत.

-मनोरंजनासाठी ब्ल्यूटूथ सुविधा असलेला एफएम रेडिओ लावला आहे.

- या साऱ्या यंत्रणा सौरऊर्जेवर चालतात. ज्या शेतकऱ्यांकडे शेतात विजेची सुविधा नाही किंवा भारनियमनाच्या काळात वीज नसलेल्या काळातही कोणतीही अडचण भासत नाही. सौर ऊर्जा साठवणीसाठी ४० ॲम्पिअर क्षमतेच्या बॅटरी वापरल्या आहेत. त्या सौरऊर्जेवर पूर्ण चार्ज झाल्यानंतर एक फॅन आणि एक बॅटरी चालविल्यास बारा तास चालते. निवारा कक्षावरील सर्व विजेची उपकरणे चालवली तरी सहा तासापर्यंत सुविधा मिळू शकतात, असे योगेश यांनी सांगितले.

- निवारा कक्षाच्या खालील बाजूस झुला लावला आहे. दिवसा कामातून विरंगुळा म्हणून त्यावर बसण्याचा आनंद घेता येतो.

- या संपूर्ण निवारा कक्षाचे वजन ५०० किलो असून, सर्व सुविधांसह त्याची किंमत ८५ हजार रुपये इतकी होते.

योगेश लिचडे, ८४१२९४४७९९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com