डॉ. प्रियंका खोले Climate Smart Agriculture: खोल नांगरट पाणी मुरण्याची क्षमता वाढते. तण नियंत्रणास मदत होते. जमिनीची भौतिक रचना सुधारते.झीरो टिल सीड ड्रिल कमी मशागत करून पेरणी करता येते. नैसर्गिक ओलावा टिकतो. इंधन व मजुरी खर्च कमी होतो..आच्छादनपीक अवशेषांचे व्यवस्थापन, सेंद्रिय कर्ब वाढतो. ओलावा संवर्धन सुधारते.रिज अँड फरो प्लांटरमुळांजवळ ओलावा टिकतो. पाण्याचा कार्यक्षम वापर होतो. कमी पावसाच्या भागासाठी उपयुक्त..Farm Mechanization Subsidy: अनुदानाअभावी ‘यांत्रिकीकरण’ ठप्प.लेझर लँड लेव्हलरजमीन अचूक समतल होते. सिंचनातील पाण्याची बचत होते. पिकांची वाढ एकसमान होते.आंतरमशागत यंत्रेब्लेड हॅरो, व्हील हो आणि पॉवर वीडर यांसारखी यंत्रे उपयुक्त ठरतात.तणनियंत्रण प्रभावी होते. माती भुसभुशीत राहते. ओलावा टिकून राहतो..Farm Mechanization: कृषी यांत्रिकीकरणाचे कोट्यवधींचे अनुदान रखडले.स्मार्ट सिंचन व्यवस्थापनकृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणाली मातीतील ओलाव्यानुसार सिंचनाचे नियोजन करतात. आवश्यक तेवढेच पाणी वापरले जाते. पाण्याची बचत होते, सिंचन कार्यक्षमता वाढते.सेन्सर आधारित सिंचनमातीतील ओलावा मोजण्यासाठी सेन्सरचा वापर केला जातो. अनावश्यक सिंचन टाळले जाते. ओलावा व्यवस्थापन सुधारते. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित स्मार्ट शेतीस उपयुक्त. .कमी पावसात उपाययोजनाकमी कालावधीच्या व दुष्काळ सहनशील जातींची निवड करावी.वेळेवर पेरणी करावी.अत्यंत कमी पावसात झाडांची संख्या कमी ठेवावी.मृदापरीक्षणानुसार खतांचा संतुलित वापर करावा.बियाणे प्रक्रिया, जिवाणू खतांचा वापर करावा.आंतरपीक पद्धती अवलंबावी.- डॉ. प्रियंका खोले, ७७९८१६५०४९(विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी) कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, जि. नांदेड).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.