Nature Evolution: स्टॅनफोर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात वळणावळणाच्या नद्या वनस्पती किंवा झाडांनी त्यांचे काठ स्थिर करण्याच्या खूप आधीपासूनच अस्तित्वात असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे झाडांनीच नद्यांना वळवले असल्याचा भूगर्भशास्त्रातील मध्यवर्ती कथनालाच आव्हान मिळाले आहे. भूगर्भशास्त्रामध्ये दीर्घकाळापासून रुजलेल्या नद्यांच्या वळणावळणाने वाहण्याच्या क्रियेसाठी आणि त्यांचे काठ स्थिर होण्यासाठी झाडे, झाडोरा कारणीभूत असल्याचा सिद्धांत मांडला जातो. मात्र जमिनीवरील वनस्पतींचा उदय हा सुमारे ५०० दशलक्ष वर्षांपूर्वी झाला आहे. त्या आधीपासूनच नद्यांचे स्वरूप आणि वर्तन हे वळणावळणाचे असल्याचे स्टॅनफोर्डमधील संशोधकांच्या गटाला दिसून आले आहे. .नद्या सामान्यत: दोन मुख्य श्रेणींमध्ये मोडतातवेणीसदृश नद्या - अनेक उथळ पाणी प्रवाह हे मध्ये मध्य तयार झालेल्या वाळूच्या बेटांमुळे एखाद्या वेणीप्रमाणे दिसतात. त्यांना वेणीसदृश नदी (braided river) म्हणतात.वळणावळणाच्या नद्या- ज्यात एकच प्रवाह संपूर्ण व्यापक वक्र कोरत पुढे जातो.अनेक दशकांपासून भूगर्भशास्त्रज्ञांचा असा विश्वास होता, की वनस्पती उत्क्रांत होण्यापूर्वी बहुतेक नद्या वेणीसदृश होत्या. मात्र वनस्पतींनी नदीकाठ आणि गाळ अडवून त्यांच्या वळणांना योग्य तो आकार देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. पारंपरिक हा दृष्टिकोन भूगर्भीय नोंदी चुकीच्या पद्धतीने वाचत असल्याचा दावा करत स्टॅनफोर्डच्या अभ्यासकांनी या दृष्टिकोनालाच ‘सायन्स जर्नल’मध्ये प्रकाशित लेखामध्ये आव्हान दिले आहे..त्यांनी मांडलेल्या नवीन निष्कर्षांमधील युक्तिवाद असा...वनस्पती नसलेल्या नद्या देखील अनेक वळसे घेत वेणीसदृश रचना तयार करू शकतात. त्या नद्यांप्रमाणेच यांचेही वाळूंचे साठे मागे राहतात. फक्त फरक इतकाच आहे, की त्या नदीची शैली पूरक्षेत्रात किती काळ गाळ, कार्बन आणि पोषक घटक साठवते यानुसार तिचा प्रभाव कसा पडणार हे ठरते. अशा अनेक नद्यांमुळे पृथ्वीच्या इतिहासात परिसंस्था आणि हवामान दोन्ही आकार घेत आले आहेत..Agriculture Research: नॅनो खतासाठी एकत्रित संशोधनाची गरज.‘स्टॅनफोर्ड डोअर स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी’ मधील मॅथ्यू लापोट्रे यांच्या प्रयोगशाळेतील कार्यरत पीएच.डी. विद्यार्थी आणि या संशोधनाचे प्रमुख लेखक मायकेल हॅसन म्हणाले, की ‘‘वनस्पतींचे जीवन पहिल्यांदा जमिनीवर विकसित झाले तेव्हा भूदृश्य कसे दिसायचे या व्यापकपणे स्वीकारल्या जाणाऱ्या कथेलाच या अभ्यासाद्वारे आम्ही आव्हान देत आहोत. त्यातून वनस्पती आणि नद्यांमधील परस्पर संबंधांची कहाणी पुन्हा लिहावी लागणार आहे. ’’.सक्रिय नदी वाहिनीचे ड्रोन दृश्यवळणावळणाच्या नद्यांचे चिखलमय पूर मैदाने - हजारो वर्षांपासून नदीच्या पुरांमुळे तयार झालेल्या गतिमान परिसंस्था आहेत. हे ग्रहावरील सर्वात मुबलकपणे आढळणाऱ्या समुद्राशिवायच्या कार्बन जलाशयांपैकी एक आहेत. वातावरणातील कार्बन पातळी (कार्बन डायऑक्साइडच्या स्वरूपात) पृथ्वीच्या भोवती वातावरण विशेषतः तापमान नियंत्रणाचे काम (थर्मोस्टॅटप्रमाणे) करते. हा घटक मोठ्या कालखंडापासून तापमान नियंत्रित करत आहे. वळणावळणाच्या नद्यांनी तयार केलेल्या कार्बन साठ्यांचे अचूक अंदाजपत्रक मांडता आल्यास शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या प्राचीन आणि भविष्यातील हवामानाचे अधिक व्यापक मॉडेल तयार करणे शक्य होईल..याबाबत अधिक माहिती देताना हॅसन म्हणाले की, कार्बन कसे, केव्हा जमिनीत गाडले जाते किंवा वातावरणात परत सोडले जाते, हे ठरवण्यात पूर मैदाने महत्त्वाची भूमिका बजावतात. आम्ही केलेल्या अभ्यासामध्ये पूर मैदानांमध्ये झालेली कार्बन साठवणूक ही वनस्पतीच्या उदयानंतर म्हणजेच गेल्या काही शे दशलक्ष वर्षांपासून घडली आहे, या सामान्य गृहीतकापेक्षाही खूपच जास्त असल्याचे दिसून आले. .नदी कुठे व कशी वाहते?वनस्पतींचा नद्यांच्या संरचनेवरील प्रभाव मोजण्यासाठी संशोधकांनी सध्याच्या वळणावळणाच्या ४९ नद्यांमधील सुमारे ४,५०० वळणांच्या उपग्रह प्रतिमा तपासल्या. त्यातील सुमारे अर्ध्या नद्या वनस्पतीसहित होत्या, तर अर्ध्या नद्या दाट किंवा अंशतः वनस्पतीसहित होत्या.त्यानंतर संशोधकांनी पाण्याच्या प्रवाहात गाळ जमा होऊन नदीच्या वळणाच्या आतील बाजूस विकसित होणाऱ्या वाळूच्या बेटांवर (इंग्रजीमध्ये याला पॉइंट बार असे म्हणतात.) लक्ष केंद्रित केले. हे भाग वेणीसदृश नद्यांच्या मध्यभागी तयार होणाऱ्या वाळूच्या पट्ट्यांप्रमाणे (पॉइंट बार) नद्यांच्या केंद्रांपासून बाजूला स्थलांतरित होतात. कालांतराने, हे स्थलांतर नद्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पातळ वाहिनी आकारांना वळणावळणाच्या दिशेमध्ये नेण्यात योगदान देते..Ocean Research: समुद्रतळाखाली गोड्या पाण्याचा साठा सापडला.नदीच्या शैलीवर आधारित हे वाळूचे पट्टे वेगवेगळ्या ठिकाणी तयार होतात. भूगर्भशास्त्रज्ञ गेल्या काही दशकांपासून प्राचीन नदी मार्ग शोधण्यासाठी खडकांच्या नोंदीवर अवलंबून असतात. विशेषत: वाळूचे खडक आणि चिखलाचे खडक हे वेगवेगळ्या नदी शैलींचे पुरावे देतात. कारण प्रत्येकी वेगवेगळ्या प्रकारचे आणि प्रमाणात खडक-निर्मिती करणारा गाळ जमा होत जातो. त्यातून भूगर्भशास्त्रज्ञ प्राचीन काळातील नद्यांची भूमिती समजू शकतात. त्यातून ती नदी कशी वाहत असेल, याचे अंदाज बांधता येतात. जर वाळूच्या दगडांनी पॉइंट बार स्थलांतराच्या कोनात फारसा फरक दाखवला नाही, तर भूगर्भशास्त्रज्ञांनी त्या बारच्या खाली प्रवाहात जाणारा असा अर्थ लावतात. त्यातून वेणीसदृश नदीने साठे तयार झाल्याचे मानले जाते. .या तंत्राच्या वापर करताना भूगर्भशास्त्रज्ञांना पृथ्वीवर वनस्पती पहिल्यांदा उत्क्रांत झाल्या, त्या काळात नद्यांनी त्यांच्या वर्तनात बदल केल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी निष्कर्ष काढला की जमिनीवरील वनस्पतींमुळेच गाळ साचणे, साठणे आणि काठ स्थिर करण्यातूनच नदीचे वळण शक्य झाले असावे. हाच निष्कर्ष सर्व भूगर्भशास्त्र अभ्यासक्रमात शिकवला जात असल्यामुळे रूढ होत गेला असल्याचे लॅपोत्रे यांनी सांगितले. ते डोअर स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी येथे पृथ्वी आणि ग्रह विज्ञानाचे सहायक प्राध्यापक असून, या संशोधनाचे वरिष्ठ लेखक आहेत..वनस्पतींच्या विस्तृत श्रेणी असलेल्या आधुनिक नद्यांचे निरीक्षण केल्यानंतर वनस्पती पॉइंट बार स्थलांतराची दिशा सातत्याने बदलत असल्याचे दाखवून दिले. विशेषतः, वनस्पतींच्या अनुपस्थितीत त्या पॉइंट बार खालच्या दिशेने स्थलांतरित होतात. म्हणजेच त्यांची संरचना वेणीसदृश (मध्य-चॅनेल बार ब्रेडेड) नद्यांप्रमाणे होते. जर भूगर्भशास्त्रज्ञांनी प्राचीन नद्यांसाठी वापरलेल्या निकषांचा वापर आधुनिक नद्यांवरील प्राचीन खडकांमध्ये केल्यास वळणावळणाच्या नद्याही वेणीसदृश नद्या म्हणून वर्गीकृत केल्या जातील. पण ते चुकीचे आहे. असे लॅपोत्रे म्हणाले..कालानुरूप नद्यांमध्ये होणारे बदलनव्याने मांडलेले हे निष्कर्ष पृथ्वीच्या भूतकाळातील युगांत नद्यांनी खंड कसे तयार केले आहेत, यांचे पारंपरिक चित्र उलगडण्यास मदत करतील. जर खरोखरच इतिहासात कार्बनने भरलेले पूर मैदान अधिक विस्तृतपणे मांडले गेले असेल, तर शास्त्रज्ञांना कालांतराने प्रमुख नैसर्गिक हवामान बदलांचे मॉडेल सुधारण्याची आवश्यकता भासू शकते. त्याचा परिणाम आजच्या हवामान बदलाच्या आपल्या अनेक समजुतींवर होणार आहे..दगडांमध्ये असलेल्या या माहितीसाठ्याची आधार रेखा आपल्याला नद्यांनी भूतकाळातील उद्भवलेल्या विविध परिस्थितींना कसे तोंड दिले हे दाखवतात. त्याचा अचूक अर्थ लावणे शक्य झाल्यास मानव-प्रेरित हवामान बदलांच्या स्थितीला आपला ग्रह कसा प्रतिसाद देणार आहे, हे समजू शकेल. आजही आपल्याला कार्बन चक्रातील अनेक भाग नीट समजलेले नाहीत. उदा. कार्बन कुठे साठवला जातो आणि किती काळासाठी. तो नदीचा प्रकारामुळे की पूरक्षेत्र निर्मितीमुळे साठवला जातो, हेही पूर्णपणे समजलेले नाही.- मायकेल हॅसन.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.