Tractor Sale
Tractor Sale

गेल्या वर्षीच्या तुलनेत ट्रॅक्टर विक्रीत १३ टक्के घट

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशातील ट्रॅक्टर विक्री १३ टक्क्यांनी घटली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच फाडा या संस्थेने जानेवारी महिन्यात नोंदणी झालेल्या वाहनांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशातील ट्रॅक्टर विक्री (Tractor Sale) १३ टक्क्यांनी घटली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (Federation Of Automobile Dealers Association of India) म्हणजेच फाडा (FADA) या संस्थेने जानेवारी महिन्यात नोंदणी झालेल्या वाहनांची (Regestration Of Vehical) आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या आकडेवारीवरून ट्रॅक्टर विक्री घटल्याचे दिसत आहे. देशातील प्रमुख पाच ट्रॅक्टर उत्पादक (Top Tractor Manufacturer) कंपन्यांनी अत्यंत कमी विक्री नोंदवली आहे.

हेही वाचा - रासायनिक कीडनाशकांच्या वापरात महाराष्ट्र आघाडीवर मागील महिन्यात ५५,४२१ ट्रक्टर युनिटची (Tractor Unit) किरकोळ विक्री झाली होती. जी गेल्या वर्षी जानेवारी २०२१ मध्ये विक्री झालेल्या ६१,४८५ ट्रॅक्टर युनिटच्या ९.८६ टक्के कमी आहे. तर जानेवारी २०२० मध्ये ५४,६७९ युनिटची विक्री झाली होती. महिंद्रा अव्वल -   ट्रॅक्टर उत्पादन करणाऱ्या प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेल्या महिंद्राने गेल्या महिन्यात १२,९८६ ट्रॅक्टरची विक्री केली आहे. जानेवारी २०२१ मध्ये महिंद्राने (Mahindra And Mahindra) १३,६५२ ट्रॅक्टरची विक्री नोंदवली होती. गेल्या वर्षीच्या २३.४३ टक्क्यांच्या तुलनेत यंदा महिंद्राचा विक्रीतील वाटा २२.२० टक्क्क्यांवर गेला आहे. महिंद्राच्या स्वराज (Mahindra Swaraj) डिव्हिजनने जानेवारी २०२१ मध्ये ट्रॅक्टरच्या किरकोळ विक्रीत मागील वर्षी विक्री झालेल्या १०,३३९ युनिट्सवरून ९३२१ युनिट्सपर्यंत घट नोंदवली आहे. असे असले तरी त्यांचा  बाजारातील हिस्सा १६.८२ टक्के कायम आहे.

हेही वाचा - महिला कृषी उद्योजक, स्टार्ट अप्सनाही प्रोत्साहन सोनालिका ट्रॅक्टरच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या ७६०० युनिट विक्रीसह सोनालिकाचा बाजारातील हिस्सा १३.७१ टक्के होता. या तुलनेत गेल्या वर्षी ८७२१ युनिटच्या विक्रीसह बाजारातील हिस्सा १४.१८ टक्के होता. सोनालिकाने नुकत्याच लाँच केलेल्या DI 75 4W CRDs ट्रॅक्टरची जोरदार विक्री नोंदवली आहे. ज्याची किंमत ११ लाख रुपये इतकी आहे.    

गेल्या महिन्यात सर्वाधिक विक्री करणाऱ्या एस्कॉर्ट, टाफे आणि जॉन डिअर यांचा समावेश आहे. एस्कॉर्ट आणि  टाफे या दोघांची गेल्या वर्षीच्या तुलनेतील विक्री अनुक्रमे ५४६७ आणि ५४३० युनिट्सपर्यंत घसरली आहे. तर दुसरीकडे जॉन डिअरच्या विक्रीत किरकोळ वाढ (४८४९ युनिट) झाली आहे. दरम्यान, गेल्याच महिन्यात झालेल्या सीईएस टेक्नॉलॉजी एक्स्पोमध्ये जॉन डिअरने संपूर्ण स्वयंचलित ट्रॅक्टर लाँच केला आहे. मात्र, कंपनीने अद्याप भारतात ट्रॅक्टर लाँच करण्याची तारीख जाहीर केली नाही.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com