ज्ञानेश्वर ताथोड, डॉ. ए. व्ही. गजाकोस, डॉ. डी. एस. कराळेमागील लेखामध्ये आपण पेरणी यंत्राचे काही प्रकार पाहिले. या लेखामध्ये बीबीएफ प्लांटर सारख्या अत्याधुनिक पेरणी यंत्रांची माहिती घेऊ..रुंद वरंबा सरी पेरणी यंत्र (बी.बी.एफ. प्लांटर)विविध पिकांच्या पेरणीसाठी ट्रॅक्टरचलित असे आधुनिक, बहुउपयोगी आणि अत्यंत प्रभावी साधन आहे. या यंत्राने एकाच वेळी रुंद वरंबे व सऱ्या पाडणे, पिकांची पेरणी करणे, पेरून रासायनिक खते देणे शक्य होते. अशा प्रकारे एकाच वेळी अनेक कामे पार पडत असल्यामुळे वेळ, मजूर आणि खर्चाची बचत होते. .BBF Technology: बीबीएफ तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान.यामुळे तयार होणाऱ्या सऱ्या या पावसाच्या पाण्याच्या संवर्धनासह निचऱ्याचेही काम योग्य प्रकारे करतात. कमी पावसाच्या काळात पाणी मुरण्यास मदत होते, तर जास्त पावसाच्या काळात अतिरिक्त पाण्याचा सुरक्षितपणे निचरा करण्यात मदत करतात. याचा पिकाला फायदा होतो. मुळांची वाढ चांगली होते. जमिनीची सुपीकता टिकून राहते..बी. बी. एफ. प्लांटर यंत्राची रचनाहे ट्रॅक्टरचलित यंत्र चालविण्यासाठी ३५, ४५ ते ५० अश्वशक्तीचे ट्रॅक्टर आवश्यक असतात. बीबीएफ यंत्राने पिकाच्या गरजेनुसार ६० ते १५० सेंमी रुंदीचे वरंबे तयार करता येतात. जास्त अंतरावरील पिकांसाठी वरंब्यावर दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकांसाठी चार ओळी घेऊन नियोजनबद्ध लागवड करता येते. या यंत्रामध्ये पेरणीची खोली कमी अधिक करण्यासाठी नियंत्रणाकरिता चक्र दिले आहे. वरंब्यांवर केलेल्या पेरणीमध्ये आंतरमशागत व फवारणी यांत्रिकी पद्धतीने सहज करता येते..BBF Technology : बीबीएफ तंत्रज्ञान : कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान.वैज्ञानिक प्रयोगांतून दिसलेले यंत्राचे प्रत्यक्ष फायदेबियाण्यात २०% पर्यंत बचत : बीबीएफ यंत्रातील पेरणी यंत्रणा अचूक अंतर आणि खोली राखते. यामुळे बियाण्याचा अपव्यय थांबतो बियाणे २० टक्क्यांपर्यंत कमी लागते. तितकी आर्थिक बचत होते.ओलावा टिकवते ः पावसाचे पाणी सऱ्यांमध्ये साठते. त्या साठलेल्या ओलाव्याचा आधार पिकाला १२ ते १५ दिवसांपर्यंत मिळतो. कमी पावसाच्या प्रदेशात पिके तग धरून राहण्यासाठी हा ओलावा अत्यंत महत्त्वाचा ठरतो..मजुरी आणि वेळेत बचत : या यंत्राद्वारे एकाच वेळी वाफे, सऱ्या पाडण्यासोबतच बियांची व खतांची पेरणी शक्य होते. परिणामी मजुरांवरील अवलंबन ४० ते ५० टक्क्यांपर्यंत कमी होते.आंतरमशागत सोपे : या यंत्राच्या बनावटीमुळे आंतरमशागतही सोपी होते. आंतर मशागतीच्या खर्चात बचत होते.- ज्ञानेश्वर ताथोड ९६०४८१८२२०(कृषी शक्ती व अवजारे विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.