Modern Farming: जमिनीतून मातीचा नमुना घेऊन माती परीक्षण करून घ्यावे. त्यातील कमतरतेनुसार खतांच्या (नत्र, स्फुरद, पालाश - NPK) योग्य नियोजन करण्यासाठी विविध उपकरणे आणि प्रणाली मदत करतात. त्याच प्रमाणे पिकाच्या संरक्षणासाठी रोग व कीड येण्याआधीच प्रतिबंधात्मक किंवा आल्यानंतर तत्काळ नियंत्रण उपाययोजना करण्यासाठीही ड्रोन तंत्रज्ञान व सेन्सरयुक्त फवारणी अशा प्रणालींचा वापर होतो. या पूर्वीच्या काही लेखातून याची माहिती घेतलेली आहे. .तण आणि पालापाचोळा व्यवस्थापनासाठी यंत्रेफळबागेत तण नियंत्रण आणि जमिनीचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी या यंत्रांचा उपयोग होतो.अ) श्रब्स/ब्रश कटर : ही यंत्रे झाडांच्या ओळीतील तण किंवा छाटणीनंतर पडलेला पालापाचोळा बारीक तुकड्यांमध्ये कुट्टी करून जमिनीवर आच्छादन पसरली जातात. यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो, जमिनीची धूप कमी होते आणि तणांची वाढ रोखली जाते.ब) ट्रॅक्टरचलित मल्चर : हे यंत्र ट्रॅक्टरच्या मदतीने तण आणि पालापाचोळा बारीक करते. त्याचे लहान तुकडे जमिनीवर समान रीतीने आच्छादित करते. हे सेंद्रिय आच्छादन तयार करण्याचा उत्तम मार्ग आहे..Agriculture Technology: शेतीमध्ये ‘इलेक्ट्रो कल्चर’ तंत्रज्ञानाचा वापर.नेव्हिगेशन आणि मार्गदर्शनासाठी तंत्रज्ञानजीपीएस आणि आरटीके जीपीएस : या तंत्रज्ञानामुळे ट्रॅक्टर किंवा स्वयंचलित यंत्र अचूकपणे झाडांच्या ओळीत चालवले जाते. यामुळे एकाच जागेवर वारंवार मशागत करणे किंवा मशागत न होता जागा सुटून जाणे टळते.ऑटो-स्टिअरिंग : हे तंत्रज्ञान ट्रॅक्टरला आपोआप सरळ रेषेत किंवा झाडांच्या ओळीच्या वक्रतेनुसार चालवते, त्यामुळे चालकाला कमी श्रम लागतात..काढणीचे स्वयंचलनस्वयंचलित काढणी यंत्र : काही प्रगत यंत्रे फळांची पक्वता पातळी ओळखून त्यानुसार निवडक फळे आपोआप काढू शकतात. यामुळे मानवी श्रमाची आणि वेळेची मोठी बचत होते.नियंत्रित कक्ष तंत्रज्ञान (कंट्रोल्ड ॲटमोस्फीअर टेक्नॉलॉजी) ः काढणीनंतर फळांची साठवणूक करण्यासाठी तापमान, आर्द्रता आणि हवेतील वायूंचे प्रमाण (ऑक्सिजन, नायट्रोजन) स्वयंचलितपणे नियंत्रित केले जाते. यामुळे फळांचे आयुष्य खूप वाढते.हे सर्व तंत्रज्ञान फळ उत्पादनामध्ये कार्यक्षमता, अचूकता आणि दर्जेदार उत्पादनासाठी खूप महत्त्वाचे ठरते. या आधुनिक स्वयंचलित साधनांचा वापर करून फळबागेतील कामे जलद, अचूक आणि कमी खर्चात करणे शक्य होते, ज्यामुळे उत्पादकता आणि मालाची गुणवत्ता वाढते..मशागत व आंतरमशागतीचे स्वयंचलनरोबोटिक नांगरणी आणि मशागत यंत्रांमध्येही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जीपीएस प्रणालीचा वापर केला जातो. ही यंत्रे आपोआप जमिनीची मशागत आणि तण नियंत्रण करू शकतात. फळबागेतील झाडांच्या ओळींमध्ये आणि ओळीतील झाडांच्या खोडाजवळ योग्यरीत्या मशागत करण्यासाठी स्वयंचलित आणि प्रगत अवजारे वापरली जातात..Agriculture Technology: शाश्वत शेतीसाठी थर्मल सेन्सर्स.स्वयंचलित तण नियंत्रण यंत्रेपारंपरिक मजुरांद्वारे केल्या जाणाऱ्या तण नियंत्रणापेक्षा ही यंत्रे खूप वेगवान आणि कार्यक्षम आहेत.अ) सेन्सर-आधारित तणनाशक फवारणी यंत्र : हे यंत्र झाडांच्या ओळींमध्ये चालवले जाते. यात अल्ट्रासोनिक किंवा ऑप्टिकल सेन्सर लावलेले असतात. हे सेन्सर तण आणि फळझाडांमधील फरक ओळखतात. जेव्हा फळझाडाच्या ओळीतील तण सेन्सरला दिसते, तेव्हाच निश्चित जागेवर तणनाशकाची फवारणी केली जाते.फायदा : यामुळे तणनाशकाचा अपव्यय टळतो. पारंपरिक फवारणीच्या तुलनेत ५० टक्के ते ७० टक्क्यांपर्यंत रसायनांची बचत होते. मुख्य फळझाडांवर फवारणी न झाल्याने त्यांना नुकसान होत नाही..ब) रोबोटिक वीडर : हे पूर्णपणे स्वयंचलित रोबोट कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इमेज प्रोसेसिंगचा वापर करतात. हे रोबोट कॅमेऱ्याद्वारे तणाचे चित्र घेऊन ते अचूकपणे ओळखतात. मग त्या तणाला लहान अवजाराने उपसून काढतात. किंवा अत्यंत कमी प्रमाणात रसायनाची फवारणी करतात..झाडांच्या ओळीतील मशागत अवजारेफळझाडांच्या खोडाजवळ मशागत करणे हाताने करणे वेळखाऊ असते. त्यासाठी खास अवजारे वापरली जातात :अ) हायड्रॉलिक ऑफ-सेट रोटर : ट्रॅक्टरला जोडले जाणारे हे अवजार झाडांच्या ओळीच्या बाजूने चालवले जाते. यात हायड्रॉलिक सेन्सर किंवा बम्पर्स बसवलेले असतात. ट्रॅक्टरच्या बाहेर ऑफ-सेट (बाजूस) चालताना झाडांच्या खोडाजवळ मशागत करते. झाडाच्या खोडाजवळ येताच बम्पर किंवा सेन्सरच्या मदतीने ओळखून ते आपोआप बाजूला सरकते. झाड ओलांडून पुढे गेल्यावर पुन्हा आपोआप मशागत सुरू करते. यामुळे झाडाच्या खोडाला कोणतीही इजा न होता संपूर्ण बागेतील आंतरमशागत जलद होते..ब) हायड्रॉलिक टिल्ट-शिफ्ट रोटाव्हेटर : हे आधुनिक रोटाव्हेटर ट्रॅक्टरला जोडलेले असून, हायड्रॉलिक यंत्रणेमुळे तिरपे आणि बाजूला सरकवण्यास मदत करते. बागेतील जमिनीचा उतार किंवा झाडांची ओळ थोडी वाकडी असली तरी हे रोटाव्हेटर ऑपरेटरच्या नियंत्रणाखाली हायड्रॉलिक प्रणालीने समायोजित केले जाते. परिणामी मशागत अचूक होते..डॉ. सचिन नलावडे ९४२२३८२०४९सहयोगी अधिष्ठाता, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.