बैलचलित बहूपीक टोकण यंत्रामध्ये पिकानुसार वेगवेगळ्या तबकड्या असून त्या सहज बदलता येतात. बियाणे व खत योग्य प्रकारे पेरता येते. दोन फणातील अंतर गरजेनुसार बदलता येते. बैलचलित तीन पासेच्या कोळप्याने एका मजुराच्या साह्याने आपण तीन ओळीतील आंतरमशागत आणि खत देण्याचे काम एकाचवेळी करू शकतो.
बैलचलित बहुविध अवजारे यंत्र खरीपमध्ये बऱ्याचवेळा पेरणी, रासणी आणि तणनाशक फवारणीचे काम एकामागे एक करताना पावसामुळे बऱ्याच अडचणी येतात, त्यामुळे खंड पडतो. त्यादृष्टीने बैलचलित बहुविध अवजारे ओढणी यंत्र फायदेशीर ठरते.
वैशिष्ट्ये
फायदे
गादीवाफ्यावरील हळद व आले काढणी यंत्र पारंपरिक पद्धतीमध्ये गादी वाफ्यावरील हळद व आले काढणीचे काम बळीराम नांगर किंवा मजुराच्या साह्याने खोदकाम करून केले जाते. त्यामुळे काढणीचा खर्च व वेळ वाढतो. हळद, आल्याचे नुकसान होते. हे लक्षात घेऊन गादी वाफ्यावरील हळद व आले काढणी यंत्र विकसित केले आहे.
बैलचलित तीन पासेचे कोळपे पारंपरिक पद्धतीमध्ये कोळपणी करताना दोन/तीन कोळपी एकाच जू वर दोन/तीन मजुरांच्या साह्याने आंतर मशागत केली जाते. ज्वारी, बाजरी, मका इ. पिकासाठी खत पेरणीकरिता वेगळे मजूर लागतात. त्यास जास्त वेळ आणि खर्चही वाढतो. हे लक्षात घेऊन बैलचलित तीन पासेचे खत कोळपे विकसित केले आहे.
वैशिष्ट्ये
- ए. ए. वाघमारे, ८२७५९४७५३१ - प्रा. डी. डी. टेकाळे, ९८५०१४११२१ (अखिल भारतीय समन्वयक संशोधन प्रकल्प, कृषी क्षेत्रात पशु शक्तीचा योग्य वापर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.